लेखक: सतिश रघाताटे, रा. हिंगणघाट मोबाईल न. 8788059150
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ऐका पहा वाचा अनुभव घ्या आणि शांत बसा. कारणं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार सहन करण्याची सवय आम्हाला लागली आहे. आणि आम्ही जनता हे मुकाट्यानं सहन करतो आहे कारण प्रतिकार करण्याची आमची शक्ती क्षीण झाली आहे. लोकशाहीत जनता हे सर्वोच्य आहे पणं आम्ही या देशाचे राज्याचे मालक आहोत हेच मुळात आम्ही विसरलो आहोत.
मागील अकरा दिवसात भूमिपूजनाची ट्रिपल सेंच्युरी ऐकायला किती छान वाटते कान अगदी तृप्त होतात विकासच विकास सगळीकडे असे वाटायला लागते. पणं सत्य आणि भ्रम यात खूप अंतर आहे एखाद्या विषयाच्या खोलात आपणं जातो तेंव्हा भ्रमाचा भोपळा फुटलेला असतो. गेल्या काही दिवसात आपल्या हिंगणघाट शहरात भूमिपूजनाचा सपाटा सुरू आहे. रेकॉर्ड ब्रेक अकरा दिवसात तीनशे भूमिपूजन ३०० नवीन रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनणार आपल्या गावात एवढा विकास होणारं म्हंटल्यावर कोणालाही आनंदच होइल आणि झाला पाहिजे पण नेमके वास्तव काय?
५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन हिंगणघाट शहरात झाले जवळपास ३०० भूमिपूजन झाले. असे आपले आमदार साहेब स्वतःच सांगतात आणि सर्वांनी पाहिले पणं. ज्या वॉर्डांत भूमिपूजन झाले त्या वॉर्डांत सर्वप्रथम एक बँड यायचा बसायला खुर्च्या, पाच पन्नास लोकांचा नाष्टा चहा ची व्यवस्था म्हणजे जवळपास एका भूमिपूजनाचा खर्च 10 हजार रुपयांच्या घरात. भूमिपूजन झाले 300 × 10000 =3000000 म्हणजे निव्वळ भूमिपूजनाचा खर्च 30 लक्ष त्याशिवाय निमंत्रण कार्ड रूपी माहिती पुस्तिका या एका पुस्तिकेचे किँमत जवळपास 100 रूपये जवळपास 20000 पुस्तक रूपी निमंत्रण पत्रिका या छापल्या असाव्या म्हणजेच 200 × 10000 एकूणच काय तर 50 कोटी चे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे प्रसिद्धी करीता 50 लक्ष रूपये खर्च झाला असावा असे प्रथम दर्शनी तरी वाटते म्हणजेच एकूण रकमेच्या दहा टक्के खर्च फक्तं प्रसिध्दी वर याला आपण कोणता विकास समजायचं?
आमदार साहेब म्हणतात या आधी असे काही करायची कुणी हिम्मत केली नाही. बरोबरच आहे? त्यांचे हे अस काही करायची या आधीच्या कुठल्याच आमदारांची हिम्मत झाली नाही. भूमिपूजन झाले रस्त्यांच्या कामाचा दर्जा काय असेल. या आधी जे रस्ते झाले त्याची गिठी बाहेर निघाली रस्ते एकदम सीसीटीव्ही कॅमेरे लागले सहा महिन्यात बंद पडले, खालच्या स्तरातील बनवले गेले. नवीन रस्ते बांधले गेले आणि तेच रस्ते अमृत योजनेच्या नावाखाली फोडल्या गेले अमृत योजनेच्या माध्यमातून जे काम झाले ते अतिशय निच दर्जाचे. विकासाच्या नावावर फक्तं आणि फक्त काही ठराविक कार्यकर्ता पोसण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे या सर्व प्रकारात जनतेचा काय फायदा झाला तर काहीच नाही. स्वयंघोषित कार्य सम्राट आमदार समिर कुणावार साहेब आपला विकास हा वांझोटा आहे. या आधीच्या आमदारांनी काय केलं काय नाही केलं यावर सविस्तर आणि वेगळी चर्चा होऊ शकते. पणं गेल्या नव वर्षापासून तूम्ही आमदार आहात मोठ मोठाले आकडे फुगवून सांगीतले म्हणजे विकास होत नाही आपणं दिलेले आकडे फसवे आणि पूर्ण पने फसवे आहे. हे मी अत्यंत जाणिवपूर्वक सांगतो गेल्या नव वर्षांत फक्तं ठेकेदार जगवण्याच काम सुरू आहे आपणं केलेल्या तथाकथीत विकासाचा कुठलही फायदा जनतेला झाला नाही.
हिंगणघाट शहरात सीसीटीव्ही लावले त्यात ८५ लक्ष रुपयांचा चुराडा झाला, अमृतं योजनेत करोडो खर्च झाला पण त्या योजनेचा जनतेला अजूनही काहिच फायदा नाही. अंतर्गत मल निस्सराय योजनेचे बारा वाजले, बंधारा भ्रष्टाचार अजुन तसाच आहे. पाण्याच्या टाक्या कोरड्या ठाक पडल्या आहे, तहसील कार्यालय चौक ते सरकारी दवाखाना चौक या रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नाही एक वर्षापासून या रस्त्याचया बाबतीत पोरखेळ सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयात ४०० बेड चे श्रेनिवर्धन केले म्हणून आमदार साहेबांनी श्रेय घेतले पण अजून कशाचा कशाला पत्ता नाही, उलट घाणीचे साम्राज्य दवाखाण्यात पसरले असल्याची बातमी वृत्त वाहिनीवर आले.
आज शहरातील विकासाच्या नावावर गावाचा सत्यानाश झाला तीन वर्ष आधी झालेल्या सिमेंट रोड ची परिस्थिती काय आहे. तहसील कार्यालय ते डॉ आंबेडकर चौक या रस्त्याची परिस्थिती आज काय आहे, वणां नदीवर बांधण्यात आलेला बांधारा भ्रष्टाचाराची भेट चढला आणि तो भ्रष्टाचार दाबण्याचा कार्यक्रम स्वयंघोषित कार्यसम्राट आमदार समिर कुनावार यांनी स्वतःच्या राजकिय फायद्यासाठी केला असा माझा या माध्यमातून स्पष्ट आरोप आहे. या सर्व गोष्टी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आज गरज आहे. विकास नेमका कोणाचा हा खुप मोठा संशोधनाचा विषय आहे असं सर्व सामान्य जनतेला वाटायला लागले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…