हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेचा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बामणी येथील आदित्य प्लाझा येथे राहणारी सुषमा पवन काकडे ही गर्भवती महिला आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासाठी चॉकलेट घेण्यासाठी दुचाकी वरून घरून निघाली होती. बामणी येथून राजुरा येथे जात असताना दुचाकीचा तोल गेल्याने वर्धा नदीत पुलावरून खाली पडली. त्यात सुषमा पवन काकडे या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार वर्षाच्या चिमुरडीचा जीव वाचला.
मन हेलावणारी बाब अशी की आई मृत अवस्थेत पुलाखाली पडून होती आणि चार वर्षीय निरागस बालक रात्रभर आईच्या मृतदेहाला कवटाळून रडत होता. आज पहाटे पाच वाजता पुलाखालून मुलाचा रडण्याचा आवाज कुटुंबीयांना आला तेव्हा त्यांनी खाली जाऊन पाहिले असता सुषमाचा मृत्यू झाला असून चार वर्षाच्या मुलाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयात बालकावर उपचार करण्यात आले.
या घटनेची पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी महिलेला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी सुषमा काकडे यांना मृत घोषित केले. मृतक महिलेचे पती पवन काकडे हे पंजाब नॅशनल बँकेत कर्मचारी आहेत, सुषमा देवीच्या दर्शनासाठी बामणी येथे आल्याची माहिती समोर आली आहे, असे काय घडले की बामणीहून घरी न परतता राजुरा येथे जाण्याची गरज काय होती? आणि पुलावरच हा अपघात कसा झाला? पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतरच अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…