पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कोंढवा पोलीस स्टेशन येथून एक महिला अत्याचाराची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक 29 वर्षीय महिलेवर आरोपीने 17/08/2010 ते 14/08/2023 रोजी पर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. 1) कलीम सलीम शेख रा शिवनेरी नगर 2) अश्रफ शेख रा कोंढवा असे आरोपी इसमाने नाव असून याच्यावर कोंढवा पोलीस स्टेशन भादंवि कलम 376(2) (n) 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 29 वर्षीय पिडित महिलेने तक्रार दाखल केली होती. कलीम सलीम शेख व अश्रफ शेख याने युनिटी पार्क कोंढवा, साई हॉटेल येवलेवाडी, कोंढवा पुणे येथे या महिलेवर 2010 पासून अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला. अशी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांचा मित्र अश्रफ शेख याने त्याचा मित्र कलीम शेख याची ओळख फिर्यादी यांचेशी करून दिली. अश्रफ याने फिर्यादी यांना कलीम याने त्याच्या भाच्याचा वाढदिवस आहे असे सांगून फिर्यादी यांना युनिटी पार्कच्या आठव्या मजल्यावर नेऊन बळाचा वापर करून बळजबरीने फिर्यादी यांचेशी शारीरिक संबंध केले व बदनामी करण्याची धमकी दिली त्यानंतर फिर्यादी त्यांचे सासरी सहकार नगर येथे नांदत असताना कलीम हा फिर्यादियांच्या सोबत येण्यासाठी धमकाऊ लागला तसे न केल्यास फिर्यादी यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला त्यानंतर 2016 पासून बिबेवाडी येथे फिर्यादी राहत असताना कलिम ने वेळोवेळी फिर्यादी यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांना युनिटी पार्क कोंढवा येथे मित्राच्या घरी तसेच सन 2022 मध्ये सुखसागर नगर, साई नगर ,कात्रज येथे घाडगे यांचे घरी रूम घेण्यास भाग पाडून वेळोवेळी फिर्यादी यांचे इच्छे शारीरिक संबंध ठेवले व खडीमशीन येथील हॉटेलमध्ये जाऊन फिर्यादी यांच्याशी शरीर संबंध ठेवले तसेच फिर्यादी यांना निर्वस्त्र करून कलीम ने त्याचे मित्रास कॉल करून फिर्यादी यांना यांचे निर्वस्रावस्थेतील फोटोंचे स्क्रीन शॉट काढून सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
यावेळी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलीस स्टेशन, एस डी. जाधव सहा.पोलीस निरीक्षक हे तपास करत आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…