हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यातील अतिमहत्वाचा मार्ग समजल्या जाणाऱ्या व महाराष्ट्र तेलंगणाला जोडणाऱ्या तसेच राष्ट्रीय महामार्ग असलेल्या बल्लारपूर-राजुरा मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच वर्धा नदीवरील पुलाला कठडे नसल्यानं अनेक अपघात घडले आहेत. या खड्ड्यामुळं अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला. तर अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेत. त्यामुळं या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवा व वर्धा नदीवरील पुलाला कठडे बसवा अन्यथा खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून तीव्र आंदोलन करू असा गंभीर इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.
राजुरा मार्गावरील पुलावर नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली असून चार वर्षाच्या मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी दुचाकीनं निघालेल्या गर्भवती आईचा पुलावरून तोल गेला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा रात्रभर मृत आईसोबत टाहो फोडत असल्याची घटना नुकतीच समोर आली. सुषमा पवन काकडे असे या मृत महिलेचं नाव आहे.या पुलाला कठडे असते तर महिलेचा जीव नक्कीच वाचला असता. तर पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकीवरील तोल गेल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे.
त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागाने तात्काळ या मार्गावरील खड्डे बुजवावे व वर्धा नदीवरील पुलाला कठडे बसवावे अन्यथा खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून तीव्र आंदोलन करू असा गंभीर इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…