✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पुरुषांनी केला महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.
शनिवारी दि.३ रात्री साडे आठ ते साडे नऊ या दरम्यान ही घटना घडली. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या सोसायटीत आल्यानंतर संशयिताने रस्त्यात गाडी आडवी लावली. त्यामुळे पीडितेने गाडी काढण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने संशयिताने पीडितेसह तिच्या पतीस शिवीगाळ करीत मारहाण केली व महिलेचा विनयभंग केला. तर इतर एका संशयित महिलेने लाठीने मारहाण केली. तर तिच्या वडिलांनी पीडितेस मारहाण करीत दमदाटी केली. तर दुसऱ्या गटातील पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीने घरात शिरून शिवीगाळ, मारहाण केली व विनयभंग केला. घरातील सामानाचे नुकसान केले, तसेच पतीसोबत झटापट करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ तोडून नुकसान केले व दोघांना दमदाटी केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…