मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट १८ ऑक्टोबर:- भव्य नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एस ओ एस कब्स आणि स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट यांच्यातर्फे गरबा रात्री उत्सव 2023-24 चा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धूमधड्याक्यात आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि आई दुर्गा ची आरती करून करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा सौ. श्रद्धाताई कुणावार, श्री. रोशन पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, आणि स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धा 2023 चे सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक पुरस्कार विजेते श्री. विशाल मानकर लाभलेले होते. सोबतच प्राचार्या शिल्पा चव्हाण, सहप्रशासकीय अधिकारी प्रदीप जोशी, शैक्षणिक समन्वयक सौ संतोषी बैस प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. हिंगणघाट येथील एवन डान्स इन्स्टुडिओच्या संस्थापिका शिखा मुखी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या महिलांच्या संघाने गरबा परफॉर्मन्सची सुरुवात झाली. यावेळी विविध संघांकडून गरबा फेऱ्या करण्यात आल्या. कपल्सचा गरबा परफॉर्मन्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी गटांच्या सादरीकरणाने प्रेक्षक रोमांचित झाले. शाळेतील मुलांनी या कार्यक्रमाचा मनापासून आनंद लुटला. या कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पाहुण्यांनी नवरात्रीचे महत्त्व या विषयावर प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी मिस रसिका लांबट, इशिका विंचुरकर आणि मास्टर कार्तिकेय पांडे यांनी सौ.प्रीती रोहरा, सौ.अमिना शेख, सोनल तिवारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांना सर्वोत्कृष्ट नृत्यांगना, सर्वोत्कृष्ट पोशाख या श्रेणीत कलाकारांना भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी हृदया वानखेडे हिने केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…