चोपड्यात गुरांचा खचाखच भरलेली आयशर गाडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पकडली 11 जनावरांचा मृत्यू.

नगरसेवक गजेंद्र जयस्वालसह गोरक्षकांची मोलाची मदत.

विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी

चोपडा:- शहरातील हॉटेल पांचाली जवळ रात्री १० :२० वाजेच्या सुमारास गुरांचा खचाखच भरलेली आयशर गाडी पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करुन पकडली असून जवळपास डझनभर गुरे मयत स्थितीत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुक्या जनावरांना क्रूरपणे नेणारे चालक क्लिनर अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. सदरील गाडी ही मध्यप्रदेश पासिंगची असून गाडी क्रमांक.एम.पी.41 6A 2558 असा आहे. तिच्यात 30 ते 35 मुकी जनावरे कोंबण्यात आलेली आढळून आली . पोलिसांसमक्ष गाडी खाली करण्याचे काम सुरू असतान 11 गुरे मयत स्थितीत आढळून आले आहेत. नेमकं हे गुरे कुठून कुठे नेत होते ते रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. नगरसेवक गजेंद्र जयस्वालसह गो रक्षकांनी मध्यरात्री पर्यंत तळ ठोकुन जनावरांना गाडीतून उतरविण्यासाठी मोलाची मदत केली.तर काही जनावरांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले तालुक्यांतील वेले गावाजवळील खाजगी आय टी आय जवळ आयशर गाडी क्र. एम पी ४१ जी ए २५५८ हया गाडीचा शिताफीने पाठलाग करत चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष पारधी, विजय बछाव, दिपक विसावे, वेलचंद पवार, रवि पाटील (होमगार्ड पी ओ ) यांनी गाडी पकडण्याचा प्रयत्न केला असता गाडी चालक व क्लिनर दोन्हींनी चालत्या गाडीतून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार होण्यास यशस्वी झाले आहेत. शहर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती की, शिरपूर कडून गुरांचा भरलेला ट्रक येत आहे. त्या माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर गाडीवर पाळत ठेवली. हातेड येथे सदर गाडी पोलिसांच्या दृष्टीस पडली. सदर गाडीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले परंतू गाडी चालक अतिशय वेगाने व बेभान पद्धतीने गुरांनी भरलेली गाडी चालवत, पोलिसांना चकमा देत वेले पर्यंत आला. सदर ठिकाणी गाडीला ओव्हरटेक करून चालकांना पकडण्याच्या आधीच चालक व क्लिनर दोन्हींनी चालत्या गाडीतून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार होण्यास यशस्वी झाले. पोलिसांनी तब्बल २१ किलोमीटर पाठलाग करून गाडी पकडली. नंतर सदर गाडी शिरपूर रस्त्यावरील हॉटेल पांचाली जवळ आणून गो रक्षकांच्या मदतीने गाडीतील जनावरांची सुटका करण्यात आली. गाडीत सर्व जनावरे त्यात गायी, गोरे अक्षरशः दोन टप्प्यांत कोंबलेले होते. गाडीत जनावरे एकमेकांना अक्षरश अमानवीय पद्धतीने बांधलेली होती. सदर जनावरांना खाली उतरवतांना मोठी दमछाक झाली. जनावरांना उभे सुध्दा राहता येत नव्हते. जनावरांना पाणी पाजून, इंजेक्शन देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. सदर गाडीत एकूण ३५ जनावरे होती पैकी ११ जनावरे दगावली आहेत इतर उर्वरीत जनावरांवर डॉ पंकज सैदाने, संतोष कणके आदींनी उपचार केले.गाडीतून जनावरे उतरविण्यासाठी गो रक्षक प्रविण जैन, प्रेम घोगरे, गजेंद्र जैस्वाल, गणेश धनगर, अजय भोई, सोनू धनगर, जिग्नेश कांखरे, गणेश चौधरी आदिंनी मेहनत घेऊन जनावरांचा जीव वाचविला.मुद्देमाल जप्त मात्र आरोपी फरार पोलिसांनी तब्बल २१ किलोमीटर पाठलाग करून गाडी पकडण्यात, मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस यंत्रणा यशस्वी झाली आहे मात्र गाडी चालक व क्लिनर दोन्हींही चालत्या गाडीतून फरार झालेच कसे असा प्रश्न चर्चिला जात आहे. तसेच सदर जनावरे कत्तलीसाठी नेमकी कुठे नेली जात असावीत.एवढ्या मोठ्या संख्येने एकाच गाडीत दोन टप्प्यांत ३५ जनावरे कोंबलीच कशी? असे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थितांमध्ये चर्चिले जात होते. भाजपचे माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल गोरक्षण कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी रात्री एक वाजे पर्यंत मृत जनावरे पुरण्यास पोलीस प्रशासनास मदत करत होते…

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

11 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

22 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

22 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

22 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

23 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

23 hours ago