संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर ,शिक्षण विभाग द्वारे दिल्या जाणारा मानाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार राजुरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आर्वी येथे भाषा विषय शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या करुणा गावंडे- जांभुळकर यांना नुकताच शिक्षक दिनी (५ सप्टेंबरला) प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कन्नमवार सभागृहात हा सोहळा थाटात पार पडला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या शुभहस्ते दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, धनंजय चाफले, प्राचार्य डायट उप मुख्याधिकारी श्याम वाखर्डे, वित्त अधिकारी मातकर तसेच जि.प.चंद्रपूर चे सर्व विभागप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देऊन त्यांना कुटुंबियासमवेत सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याबद्दल शासनमान्य विविध संस्थेकडून राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विद्यार्थ्याप्रती असलेली निष्ठा ,राबवित असलेले विविध उपक्रम व तंबाखूमुक्त शाळा करण्यात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल, महाराष्ट्रातील पहिले तंत्रस्नेही शिक्षिका सम्मेलनाचे राहुरी, अहमदनगर येथे आयोजन करून उपस्थित सर्व शिक्षिकांचा सन्मान केल्याबद्दल “महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये झालेली नोंद तसेच स्वनिर्मित 300 च्या वर शैक्षणिक व्हिडीओ यु ट्यूब ला अपलोड करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सुलभता निर्माण केली. या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांनी या पुरस्काराचे श्रेय त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पती विजयकुमार जांभुळकर, त्यांचे विद्यार्थी, प्रेरणा देणारे अधिकारी, सहकारी शिक्षक वृंद, आणि जिवलग मित्रपरिवार यांना दिले.
प्रशासक काळात निवड समितीने योग्य शिक्षकांची निवड केल्याबद्दल सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकात समाधान व्यक्त केले गेले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…