मतदार यादी वाचन विशेष ग्रामसभेस जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग. विशेष शिबिरात 3 हजार 595 अर्ज दाखल, दि.25 व 26 नोव्हेंबरला पुन्हा विशेष शिबिर
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.7:- नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करुन आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने विशेष शिबिर घेतले जात आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून मतदार नोंदणी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे देखील आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एका गावात या सभेला उपस्थित राहून मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले.
मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षन कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्यासाठी मतदार प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली असून या प्रारुप मतदार यादीतील आवश्यक दुरुस्ती व नवमतदार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 520 ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यात आले. वर्धा तालुक्यातील सिंदी (मेघे) येथील विशेष ग्रामसभेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वत: उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
जिल्हाभर दिनांक 4 व 5 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रस्तरावर विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघात 649, देवळी विधानसभा मतदारसंघातील 724, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील 911 तर वर्धा विधानसभा मतदारसंघातील 950 नागरिकांनी मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव व पत्ता बदल, वगळणी आधार जोडणीसाठी विविध नमुने भरून अर्ज सादर केले. जिल्हाभर झालेल्या या विशेष ग्रामसभेस नवमतदारांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील टप्प्यात दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रस्तरावर विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीसह उपस्थित राहणार आहे. मतदारांनी आपल्या नावाच्या नोंदणीसह नावे तपासणे, वगळणे, दुरुस्ती करणे, आधार जोडणी साठी केंद्रावर उपस्थित रहावे. मतदार याद्या अधिक अद्यावत करण्यासोबतच जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…