अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युजऑनलाईन अकोला:- डोक्याचा त्रास असल्यामुळे राधा इंगळे नामक रुग्णांला दोन महिन्याआधी सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. डोक्याचा त्रास असल्याने MRI तपासणी साठी त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जायायचे सांगितले. अत्यंत गरीब रुग्ण असल्याने त्यांची परीस्थिती नसतांना सुध्दा २००० हजार रुपये तपासणी फी भरावी लागली.
अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एमआरआय करण्यासाठी गॅडोब्राईट गॅडोपेंटेटेट डायमेग्लुमाइन इंजेक्शन यूएसपी हे दोन हजार रुपये किमंतिचे इंजेक्शन बाहेरून बोलावले व ते इंजेक्शन बोद्ध धम्मगुरू विजय किर्ती भदंत यांनी सदर रुग्णांला दोन हजार रुपये मदत देऊन बाहेरून आणावे लागले. रुग्णाची एमआरआय साठी पायपीट व रुग्णांला औषधी उपलब्ध नसल्याने होत असलेला मानसिक व आर्थिक त्रास थांबवला पाहीजे.
रुग्णाला ज्या औषधी गरजेच्या आहेत ते तरी उपलब्ध करून देण्यात यावे. सर्वोपचार रुग्णालयात जी समस्या आहे तिच समस्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहे. यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधुन रुग्णांचे केस पेपर गायब झाले होते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील कर्मचारी अटेडन्स यांना विचारणा केली असता डॉ. मिनाक्षी गजभिये ह्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रमुख आहेत त्यांना औषधाच्या तुटवड्याची पूर्ण कल्पना आहे असे सांगितले.
सर्वोपचार रुग्णालयातील व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील औषधाच्या तुटवड्याला जबाबदार शासकीय सर्वोउपचार रुग्णालयातील अधिष्ठता डॉ मिनाक्षी गजभिये असुन त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा मी तिव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडुदादा वानखडे, सामाजिक कार्यकर्ते समिर खान, सतिश तेलगोटे, सुमित तेलगोटे,प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…