✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक/पंचवटी:- चिंचबन येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. येथे डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली. नीलेशकुमार पोपटलाल छाजेड 48, रा. चिंचबन, पंचवटी असे डॉक्टरचे नाव आहे.
गळफास घेणारे डॉक्टर हे पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होते. डॉ. छाजेड यांनी सोमवारी दि. 5 सकाळी साडेसातनंतर गळफास घेतल्याचे आढळून आले. घटना उघडकीस येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. छाजेड यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय पंचवटी पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत छाजेड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पंचवटी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास केला जात आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…