अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३६
सावनेर:- शहरात पाणी पुरवठा करणारी सर्वोदय नगर येथील पाणी टंकी ही फार जुनी असून ह्या टाकी पासून अर्ध्या सावनेर शहरात पाणीपुरवठा होत आहे .
पूर्वी शहरात लोकसंख्या कमी असल्याने टाकीला पुरविण्यात येणारा वीज प्रवाह हा सामान्य होता.आज परिसरात दाट लोकवस्ती झाल्याने आल्या दिवशी वीज पुरवठा खंडित होतो.त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा बाधीत होतो.तो बाधीत होऊ नये व नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता वेगळी एक्सप्रेस फिडर लाईन देण्यात यावी.या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक तुषार उमाटे यांनी कार्यकारी वीज अभियंता दिपाली मांडेलवार यांना देण्यात आले.
तसेच सावनेर शहरातील अपूर्ण राहिलेली कामे जसे आय एम पी एस ची अंडरग्राउंड योजना पूर्णत्वास नेण्या संबंधी,आवश्यक त्या ठिकाणी केब्लींग व पोलची व्यवस्था करणे, अंडरग्राउंड योजनेच्या संबंधी ज्या जागेवर रोड फोडले व काही ठिकाणी गट्टू काढले ते व्यवस्थित फिटिंग करून देणे, अनेक ठिकाणी केबल टाकले परंतु ते केबल कनेक्शन अजून पर्यंत सुरू केलेले नाही, वरून असलेली लाइन सुद्धा काढलेले नाही या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
निवेदन देतेवेळी तुषार उमाटे महामंत्री भाजप सावनेर तालुका नरेंद्र ठाकूर, मनीष चित्तेवान, आनंद श्रीवास्तव, निळकंठ खडसे, शंकर पारवे, निखिल पोटभरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…