डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता. १३:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यंदाची दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. दिवाळी सणाचा गोडवा सर्वांना अनुभवता यावा, याकरिता खात्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येकी पाच किलो साखरेचे वाटप करण्यात आले आहे ,दिवाळीनिमित्त पोलीस आयुक्तकडून मिळालेल्या या अनोख्या गिफ्ट मुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त स्थापन होऊन पाच वर्षे झालेली आहे. या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पाच पोलिस आयुक्त शहराला लाभले. प्रत्येक अधिकारीने आपल्या परीने पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या अडचणी सोडविण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला आहे.
मात्र सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आपल्या पोलिस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणा निमित्त आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे .पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येकी ५ किलो साखरेचे वाटप केले आहे.
सण असो की उत्सव रस्त्यावर उभा असतो तो म्हणजे खाकी वर्दीतील पोलीस कुटुंबापासून दूर.. जनतेच्या रक्षणासाठी सदैव आपले कर्तव्य तत्परतेने बजावत असतो. असे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची कुणीतरी दखल घेणे आवश्यक असते. शाबास म्हणून पाठीवर हात मारणारे असे खमके अधिकारी याची त्यांना नेहमी उणीव भासत असते.
पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नेहमीच आपल्या सहकाऱ्यांची एखाद्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्य विषयी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी जागृत असत कर्मचाऱ्यांसाठी हे नवनवीन योजना राबवत असत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या रूपाने अशाच प्रकारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची अगदी कुटुंबातील एऐ सदस्य म्हणून काळजी घेणारे काळजीवाहू पोलीस अधिकारी लाभले आहे. अगदी पोलीस शिपाई यांची अडचण समजून घेतात. त्यावर त्वरित उपाययोजना करून त्यामधून मार्ग काढत असतात.
दिवाळी हा सण सर्वांना आनंदी करणारा असा सण असतो. दिवाळीमध्ये कंपनीकडून कामगारांना बोलत दिला जातो मात्र पोलिसांना दिवाळीमध्ये बोलत दिला जात नाही. सणासुदीला पोलीस आपल्या कुटुंबापासून लांब राहून बंदोबस्त चोख बजावत असतात ,विशेषतः महिला वर्ग आपले मन मारून ड्युटीवर हजर असल्याचे अनेकदा पहावयास मिळते.
या सर्व गोष्टीचा विचार करून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यंदा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या करिता विशेष योजना तयार केली. पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना ५किलो साखरेचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. यामुळे पोलीस दलातच नाही तर सर्वत्र पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या चांगल्या कामाची चर्चा सुरू आहे. हा सर्व खर्च पोलीस कल्याण निधीमधून करण्यात आला असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…