उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- बहुचर्चित किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजीत गावंडेकडून ‘समतेच्या तत्त्वावर’ जामीन मंजूर होण्यासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. या प्रकरणातील सहआरोपी धीरज गावंडेची सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच जामिनावर मुक्तता केली. या पार्श्वभूमीवर अर्जदाराची भुमिका सहआरोपी धीरज सारखीच असल्याने समतेच्या तत्त्वावर जामिनासाठी पात्र आहे. असा आशयाची याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संशयीत आरोपी रणजीत गावंडे कडून सादर करण्यात आलेल्या जामीनावर अर्जदाराने ज्येष्ठ वकील एस.व्ही. सिरपूरकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, सादर केलेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट होतं नाही की, मृतकाचा नेमका कोणाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चौकशी अहवालावरून दिसून येते की, अर्जदाराने कथितपणे वापरलेल्या लोखंडी टोचामुळे झालेल्या जखमा ओरखड्याच्या स्वरूपाच्या असून जिवघेण्या नाहीत. शवविच्छेदन अहवालात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्जदार तीन वर्षे आणि सात महिन्यांहून अधिक काळापासून तुरुंगात आहे. तर जामिनावर मुक्तता झालेल्या सहआरोपी धीरजची भूमिका अर्जदारा सारखीच आहे. त्यामुळे समतेच्या तत्त्वावर अर्जदार जामिनासाठी पात्र आहे असा युक्तिवाद केला.
प्रवीण हुंडीवाले यांच्याकडून वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता व एडवोकेट नरेंद्र धूत यांनी या अर्जावर विरोध करताना सांगितले की, सहआरोपी गावंडेच्या जामीन अर्जावर निर्णय घेताना, सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नमूद केले की आरोपी विक्रमने मृताच्या डोक्यावर तसेच सिलिंडर आणि लोखंडी स्टँडने चेहरा व मांडीवर हल्ला केला. अशा प्रकारे हे दोघे वेगवेगळ्या पायावर उभे आहेत. या निरीक्षणांना अर्जदाराने आव्हान दिले नाही. सहआरोपी धीरज गावंडे आणि अर्जदार यांची भूमिका भिन्न पातळीवर आहे, त्यामुळे समतेचे तत्व लागू होणार नाही. अर्जदाराने मृताच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात लोखंडी टोचा टोचल्याचे स्पष्ट झाले असून. अर्जदाराविरुद्ध प्रथमदर्शनी खटला असून खटला सुरू झाला आहे. फक्त तपास अधिकारी पुरावे शिल्लक असल्याने अर्ज फेटाळण्यात यावा अशा युक्तिवाद केला.
यावेळी वादी आणि प्रतिवादी यांच्याकडून केलेला युक्तिवाद, एफआयआर, आरोपपत्रातील माहिती आणि फिर्यादी व साक्षीदारांची साक्ष इत्यादीचे निरीक्षण केले असता अर्जदाराची भूमिका सहआरोपी धीरज गावंडेच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे, सुरुवातीला अर्जदाराने लाकडाने वार केल्यानंतर चेहऱ्यावर आणि डोळ्यावर लोखंडी टोचा टोचला. त्यामुळे समतेचे तत्व लागू होणार नाही.अर्जदाराविरुद्ध प्रथमदर्शनी खटला सुरू आहे. असं निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
स्वामी विवेकानंद प्राथमिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापन निवडणुकीच्या संदर्भात किसनराव हुंडीवाले आणि श्रीराम गावंडे यांच्यात वाद होऊन अकोला येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात या बाबत प्रकरण दाखल करण्यात आले होते. घटनेच्या दिवशी हुंडीवाले सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाला असताना, आरोपींनी लाकडी खुर्च्या व लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीमुळे हुंडीवाले यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…