प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभाग वर्धा जिल्ह्याच्या वतीने ओबिसीं ची जातनिहाय जनगणना करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी वर्धा यांना प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे सहकार नेते माजी आ. सुरेश देशमुख माजी आ. राजु तिमांड़े सहकार नेते सुधीर कोठारी वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनात व यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व जिल्ह्याचे युवानेते समीर देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये वर्धा जिल्हा ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष हरिश काळे यांच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनात बिहार शासनाप्रमाने केंद्र व महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जामातीने व विशेष मागास प्रवर्ग यांची जातिनिहाय गणना करावी तसेच ओबिसी मुलांची शिश्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबिसी सेल वर्धा जिल्हाध्यक्ष हरीष काळे याच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीवर केंद्र व राज्य शासनाने ताबडतोड विचार करावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबिसी सेल चे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांच्या पुढिल आदेशानुसार वर्धा जिल्ह्याच्या सेल वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदन देताना युवानेते समीर देशमुख, ओबिसी सेल वर्धा जिल्हाध्यक्ष हरिष काळे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र शेजवल, अल्पसंख्यांक विभागचे जिल्हा कार्याध्यक्ष फजलूल रहमान, ओबिसी सेल वर्धा विधानसभा अध्यक्ष विजय दरने, आर्वी विधानसभा अध्यक्ष नितीन आष्टीकर, ओबिसी सेल वर्धा तालुकाध्यक्ष राजु दोड, सेलु तालुकाध्यक्ष अरुण शिंदे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश गावंड़े, तालुका उपाध्यक्ष निलेश आगलावे, तालुका संघटक सचिन शेगोकर, कवड़ूजी बुरंगे, संजय काकडे, विनोद पांडे, विजय बोरघरे ,बालू डाहाके, प्रल्हाद चौधरी, किशोर थेटे, कैलास पोपटकर व अर्चित निघड़े राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबिसी सेलचे व पार्टीचे इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…