सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर येथे लाईफ इन्शुरन्स ऑफ इंडिया एलआयसी एजंट संघटनेच्या वतीने त्याच्या विविध मागण्यांसाठी येथील एलआयसी कार्यालयासमोर नारेबाजी करत धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी सकाळ पासूनच विमा अभिकर्त्यांनी स्वेच्छेने कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.
विमा पॉलिसीवरील जीएसटी बंद व्हावा, पॉलिसी कर्जावरील व्याज कमी व्हावे, एल.आय.सी चे खाजगीकरण होऊ नये, विमा पॉलिसीची ऑनलाईन विक्री बंद करावी, विमा प्रतिनिधी च्या ग्रॅच्युटीमध्ये वाढ व्हावी, प्रतिनिधींच्या आरोग्य विम्यात वाढ व्हावी अभिकर्ताच्या कमिशन मध्ये वाढ व्हावी. अभिकर्ताच्या मेडीक्लेम देण्यात येऊन त्यामध्ये वाढ करावी. अंशकालीन कमिशन देण्यात यावे. अश्या विविध मागण्या विमा प्रतिनिधी संघटनेच्या आहे.
या आंदोलनात बल्लारपूर संघटनेचे ब्लॉक अध्यक्ष मोरेश्वर दुर्गे, माजी अध्यक्ष किशोर अगस्ती, बल्लारपूर शाखेचे एजेंट संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण गव्हारे, सचिव नरेश भुर्से, कोषाध्यक्ष प्रशांत सोनटक्के, मनोज मुल्करवार, प्रशांत घोडे, श्याम मेश्राम, संदीप बेल्गीर इतर अभिकर्त्यांचा समावेश होता.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…