पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री चंदननगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड व नामदेव गडदरे असे चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत खाजगी चारचाकी वाहनाने पैट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक निळ्या रंगाच्या मारुती कंपनीच्या झेन गाडी मध्ये चार ते पाच संशयीत इसम चंदननगर परीसरा मध्ये फिरत असून त्यांचेकडे हत्यारे आहे.
सदर बातमीतील वर्णनाप्रमाणे मारुती कंपनीची झेन गाडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडुन संघर्ष चौकाकडे येताना दिसल्याने, सदर चारचाकी गाडीस पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी गाडीसह पळ काढला. त्यावेळी पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून गाडी थांबवुन पोलीस अंमलदार आव्हाड व गडदरे यांनी झडप घालून शिताफीने आरोपी नामे- १) गणेश दगडु शिंदे वय ३० वर्षे, रा. स्मशानभुमी जवळ, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे २) यश सर्जेराव खवळे वय १९ वर्षे, रा. पिंपरी स्टेशनचे बाजुला आदर्श हॉटेलचे बाजुला, भारतनगर, पिंपरी, पुणे तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी बँकेच्या एटीएम वर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची कबुली दिल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे विरोधात चंदननगर पो.स्टे. गु.र.नं. ३१४ / २०२२, भादविकलम ३९९, ४०२ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
त्यांचेकडुन चंदननगर पोलीस स्टेशनकडील ०४ गुन्हे, समर्थ पोलीस स्टेशनकडील ०२ गुन्हे विमानतळ पोलीस स्टेशनकडील 04 गुन्हा, लोणीकंद पोलीस स्टेशनकडील ०१ गुन्हा असे एकुण ०८ घरफोडीचे व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांचेकडुन ०१ चारचाकी गाडी २ दुचाकी गाड्या, लोखंडीकोयता, लोखंडी कटावणी, लोखंडी कटर, दोन मोबाईल फोन, एक एक्साईड कंपनीची बॅटरी, सिगारेटची पाकिटे, चप्पल जोड, मिरचीच्या पुड, नायलॉन दोरी असा एकुण २,१५,३९०/- रूपये किंवा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांचेकडुन ०१ चारचाकी गाडी २ दुचाकी गाड्या, लोखंडीकोयता, लोखंडी कटावणी, लोखंडी कटर, दोन मोबाईल फोन, एक एक्साईड कंपनीची बॅटरी, सिगारेटची पाकिटे, चप्पल जोड, मिरचीच्या पुड, नायलॉन दोरी असा एकुण २,१५,३९०/- रूपये किंवा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – ४, पुणे शहर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. सुनिल जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रविंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी मनोहर सोनवणे, संभाजी गोलांडे, पोलीस अंमलदार, सुहास निगडे, नितीन लवटे, महेश नाणेकर, प्रदिप धुमाळ, श्रीकांत शेडे, शिवाजी पांडे, सुभाष आव्हाड, नामदेव गडदरे, विकास कदम, राहुल बडेकर, सचिन चव्हान, श्रीकांत कोद्रे, शेखर शिंदे, शिवाजी निर्मळ यांचे पथकाने केली आहे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…