युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हा तून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील नरखेड तालुक्यातील शेमडा येथे जनावरांपासून पिकांचे नुकसान वाचविण्यासाठी शेतात तारेच्या कुंपणात लावण्यात आलेला वीज प्रवाहाचा करंड लागून एका आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिवाळीच्या दिवशी घडली. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरखेड तालुक्यातील शेमडा येथील राहणारे बारीकराम फदाली कडवे वय 80 वर्ष यांनी जनावरांपासून शेतातील पिकांचे नुकसान नव्हावे म्हणून ताराच्या कुंपणात वीजप्रवाह सोडला होता.
दिवाळीच्या दिवशी बारीकराम हे नऊ वर्षीय नातू तुषार अरुण डोंगरेसह दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान शेतात गेले होते. दरम्यान कुंपणाला स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार करंट लागला त्यात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गजानन बारीकराम कडवे याच्या तक्रारीवरून बारीकराम कवडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नरखेड पोलिसांनी दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…