वर्धा: बोरधरण येथे मत्स्य अधिकाऱ्यांचा बुडून मृत्यू, चौघे थोडक्यात वाचले, रात्रीची तपासणी जिवावर बेतली.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील बोरधरण परिसरात असलेल्या केजची तपासणी करण्यासाठी गेलेल्या मत्स्योद्योग विभागाचा एक अधिकारी व चार कर्मचारी टीमचा अपघात एका अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मत्स्योद्योग विभागाचा टीम तपासणी आटोपून ते परत केज परिसराकडे जात असताना बोटीतून उतरत असताना हा अपघात झाला यात प्रशासकीय अधिकाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर चौघे कर्मचारी थोडक्यात बचावले. ही घटना सेलू तालुक्यातील बोरधरण परिसरात 18 रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान घडली. युवराज खेमचंद फिरके वय 53 वर्ष रा. ठाणे, मुंबई ह.मु. नागपूर असे मृतक प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यामुळे रात्रीची ही तपासणी चांगलीच चर्चेत आली असून मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके यांच्यासह मत्स्य निरीक्षक सुनिल भिमराव ठाकरे वय 57 वर्ष रा. नागपूर, विभागीय व्यवस्थापक बंसी योगीराम गहाट वय 58 वर्ष रा. औरंगाबाद ह.मु. नागपूर, मयंक विजयसिंग ठाकूर वय 40 वर्ष रा.गाझीयाबाद ह.मु. नागपूर, सहायक मत्स्य विकास अधिकारी योगेश मोहनलाल कठाणे वय 34 वर्ष रा. बल्लारशह ह.मु. नागपूर असे पाच अधिकारी बोर धरण येथील केजची पाहणी करण्यासाठी नागपूर येथून आले होते.

रात्रीला जवळपास 8.00 वाजेनंतर त्यांनी तपासणीला सुरुवात केली आणि ते तपासणी करुन 9.00 वाजताच्या सुमारास परत केजकडे जात असताना बोटीवरून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तेथील प्लास्टीकच्या ड्रमवरुन पाचही जणांचा पाय घसरल्याने ते नदीपात्रात पडले. चौघांनी लगतच असलेल्या दोराला पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचला पण नागपूर येथील मत्स्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत धरणाच्या पाण्यात खोलवर फसलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पण, काळोख असल्याने शोध लागू शकला नाही. घटनास्थळी सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे हे रात्रीलाच कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. रविवारी सकाळीच नागपूर येथील राज्य आपत्ती निवारण दलाच्या चमूंनी धाव घेतली असून धरणातील पाण्यात मृतक युवराज फिरके यांचा शोध सुरु केला आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

चंद्रपुर जिल्हातील या विधानसभा मतदार संघात 6 हजार 853 बनावट मतदारांची नावे समाविष्ठ करण्याचा डाव फसला.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

2 hours ago

बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने अशोका विजयादशमी चे दहा दिवस महामातांच्या शौर्याचा कर्तृत्वाचा गौरवाचा विचाराचा जागर.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली…

2 hours ago

चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण आयोजित रोजगार महोत्सवात १८२४ जणांचे ऑन स्पॉट नियुक्ती पत्र.

एक पाऊल तरुणाईचे,भविष्य घडविण्याकडे- चंद्रपाल चौकसे पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन…

3 hours ago

दिप संदेश मंडळ देवळे मुंबई संघटनेतर्फे अशोका विजयादशमी व ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव कौटुंबिक सोहळ्यासह उत्साहात संपन्न.

गुणवंत कांबळे. मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सायन कोळीवाड्यातील सुप्रसिध्द तक्षशिला…

3 hours ago

माँ तुळजा भवानी देवस्थान मनिष नगर नागपुर येथे ६५१ मनोकामना घट प्रज्वलित.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माँ तुळजा भवानी…

4 hours ago