हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- महाराष्ट्र फिफ्टी बॉल्स क्रिकेटची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा बल्लारपूर येथे दिनांक 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 ला तालुका क्रीडा संकुल, गौरक्षण वॉर्ड बल्लारपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेमध्ये राज्यातील मुलामुलींच्या एकूण बारा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र फिफ्टी बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षा प्रीती निधेकर आणि सचिव संजय पारधी तसेच बल्लारपूर क्रिकेट असोसिएशनचे शब्बीर अली यांनी केले. सोबतच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे श्री सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.
या फिफ्टी बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार 11 स्टार क्रिकेट क्लब यांना प्राप्त झाला तसेच द्वितीय पुरस्कार न्यू इंडिया कॉमेंट यांना प्राप्त झाला आणि तृतीय पुरस्कार आयडियल कॉन्व्हेंट यांना प्राप्त झाला. हे पुरस्कार देण्यासाठी बल्लारपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि निर्भय ट्रान्सपोर्टचे संचालक तेजंदरजी दारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच रणरागिनी फाउंडेशनच्या संस्थापक स्नेहाताई भाटिया उपस्थित होत्या. तसेच इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट आयडियल कॉन्व्हेंटचे खेळाडू तुषार मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला. तसेच बेस्ट बॅट्समन अभिनव सिंग, बेस्ट बॉलर गौरव वाघधरे, आयडियल कॉन्व्हेंट यांना प्राप्त झाले.
पुढील महिन्यामध्ये लेदर बॉल क्रिकेट कॉम्पिटिशन 19 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित केलेली आहे. त्यामध्ये सर्व खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाच्या आधारावर दिनांक 19 ते 21 डिसेंबर 2023 ला सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र फिफ्टी बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकारी यांनी केलेली आहे.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…
भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज मकरसंक्रांत असल्यामुळे नागपूरात सर्वत्र…
*(वनश्री महाविद्यालय कोरची येथे लेखक - वाचक संवाद कार्यक्रमाचे आयोजन )* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…