हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १७८ व्या दिवशी हातात हात घेऊन आंदोलन.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्या करीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरा मध्ये होण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समितीचा संघर्ष सुरूच आहे. ते मागील अनेक दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धरने आंदोलन करीत आहे काल त्यांचा आंदोलनाचा 179 वा दिवस होता. यावेळी शासकीय वैद्यकिय महविद्याला महिला कृती समितीने हिरीरीने त्यात सहभागी झाले होते.

हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज करीता महिलांद्वारे ठरल्याप्रमाणे रविवारी सृजनशील पद्धतीने डॉ. आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात येते आहे. ह्या रविवारी महिलांनी हातात हात घेऊन 178 व्या दिवशी जोरदार आंदोलन केले. आता पर्यन्त विविध घटकांनी शहरात शासकीय मेडिकल कॉलेज यावे ह्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. त्यामधे प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिर कुणावर ह्यांनी विधानसभेत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे ह्या संबंधी प्रश्नावर प्रतिउत्तरात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेजचे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याचे संगितले होते.

त्याच मुद्द्यावर येऊन ठेपले आहे आणि पुढील वाटचाल कळायला मार्ग मुळात नाही आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ह्यांची भेट आणि त्यांचे कॅबिनेट बैठकीत बसून मागणी मान्य करून घेण्याचे आश्वासन अशा इतर वेगवेगळ्या घटना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये होण्यास अनुकूलच घडल्या. अशा रीतीने कॉलेज हिंगणघाट येथे येण्यासाठी विविध प्रयत्न सुरूच आहेत. त्यामधे अन्नत्याग सत्याग्रह उपजिल्हाधिकारी ह्यांच्या आश्वासन मिळाल्यावर मागे घेण्यात आले होते. त्यानंतर पालकमंत्री ह्यांच्याकडून आश्र्वासन घेण्यात आले. त्यानंतर महिला कृती समितीच्या आंदोलकांनी आंदोलन समितीचा पुढील निर्णय मिळवण्यासाठी ; सतत तसेच पुढे रेटायचे ठरवले आहे.

त्याप्रमाणे त्यानुसार काल 178 व्या दिवशी महिलांनी लक्ष्मीपूजनच्या दिवशी हातात हात घेऊन प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधीं ह्यांचा निषेध केला. जोपर्यंत आमचे वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास सर्व नेमलेल्या समितीची सुनियोजित कृती करण्यास पाठपुरावा सरकार,प्रतिनिधी आणि गठित समिती करणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही व सण असो वार असो आंदोलन असे चालूच राहील असा इशारा शासकीय वैद्यकीय महविद्यालय महीला कृती समितीच्या वातीनी देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सावित्रीच्या लेकी ह्या संस्थेच्या सदस्या सीमा मेश्राम, राजश्री बांबोळे, सिंधू दखणे, प्रमोदिनी नगराळे, वैशाली वासेकर, करुणा मानकर, निर्मला भोंगडे उपास्थित होत्या.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

जय बजरंग बली आखाडा मंडळ वाघोलीच्या वतीने तान्हा पोळा निमित्त नंदी लकी ड्रॉ स्पर्धा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जय बजरंग बली…

1 day ago

परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.

परतूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांचं उपोषण मागे.

1 day ago

पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी हिंगणघाट येथे भगवान महावीर स्वामींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर…

1 day ago

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा सत्कार.

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पत्रकार युवराज मेश्राम यांचा…

1 day ago