महाराष्ट्रातील ६४ पौराणिक कला जपणार- प्रा. राजकुमार घुले (लोक कलावंत)
युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर येथे लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया केंद्रीय कार्यालय, भवानीनगर पारडी नागपूर द्वारा आयोजित शाखा कमळेश्वर तालुका तर्फे बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी लोककलावंतांचा भव्य मेळावा मोठ्या आनंदमय वातावरणात आशिर्वाद लाॅन ब्राम्हणी फाटा जवळ पार पडला सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालला हा कार्यक्रम, महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला जिवंत राहावी, कलाकारांना हक्काचं व न्यायाचं व्यासपीठ मिळावं, त्यांना मानधनही मिळावं, यासाठी भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होते.
या मेळाव्यात शाहीर, खडीगंमत, पोवाडा, नाटक, भारुड भजन, कीर्तन, दहाका, दंडार, गायन, आदी कलेचं सादरीकरण उत्कृष्ट कलावंतांच्या साक्षीनं करण्यात आले. महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांना आयोजकाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले (लोककलावंत) केंद्रीय अध्यक्ष लोककला सेवा मंडळ तथा अखिल भारतीय बहुजन महासंघ हे होते.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी बाबाराव दुपारे, अध्यक्ष महा लोककला सेवा मंडळ, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेताताई बोपचे, राष्ट्रीय सहसचिव सौ. दर्शना घुले, राष्ट्रीय सचिव व्यंकट गजभिये या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय उपाध्यक्ष मनोहर धनगरे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष प्रमोद बागडे यांनी केले. यावेळी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष ईमेश्वर यावलकर, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, विदर्भ शाहीर कलाकार परिषद जिल्हा अध्यक्ष दयालजी कांबळे, संदीप उपाध्ये, मीना तायवाडे, , गंगाधर नागपुरे, शाहीर गौरीशंकर गजभिये, चित्रा गुडधे, प्रमिला वाकोडे, पद्मा मुसळे, पुरुषोत्तम डांगोरे, ईश्वर काळबांडे, राजूभाऊ, अरुणा डहाके, रामभाऊ धनजोडे हंसराज साकोरे, विद्या लंगडे, तुळसा देशमुख, शिल्पा बुरडे, सुरेश भिसे, पुरुषोत्तम डांगोरे, पत्रकार संजय खांडेकर, युवराज मेश्राम, विदर्भ शाहीर कलाकार परिषद कळमेश्वर तालुका अध्यक्ष अरुण वाहाने, विनोद मोटघरे, कवडू टोंगे, मोरेश्वर आस्कर, दिगांबर मासूरकर, विजय तुरणकर, मारोती चेले, सचिन कडू, प्रभा निंबाळकर, सुनीता काळे, वासुदेव गौरखेडे, माया गणोरकर, मारोतराव केचे, वासुदेव वाकोडे, रूपराव अरसडे, सुधाकर मुळेकर, ज्ञानेश्वर गावंडे, पुरुषोत्तम कुंभे, मारोतराव टेकाडे, दिलीप नवघरे, पांडुरंग डाकोळे, सुनील चौधरी, वासुदेव चाके, प्रशांत गुलांडे आदि दिग्गज मंडळी उपस्थित होते.
या मेळाव्यात हजारो कलावंतांनी भाग घेऊन कलेचे सादरीकरण केले, सदरील मेळाव्यास संपादक जाफर खान, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार राष्ट्रीय प्रसिद्ध प्रमुख सुभाष तगाळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…