पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पोलिसांनी जोरदार कारवाई करत अग्निशस्त्र व राऊंड जप्त करत दोन आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-4 पिंपरी चिंचवडने केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-4 चे सपोनि बाबर, पोउपनि रायकर, दळे, मुंढे, गुट्टे, सैद, चव्हाण, शिंदे असे हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गोविंद चव्हाण व धनाजी शिंदे यांनी मिळालेल्या बातमीवरून व केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून दोन आरोपी हे पिस्टल घेऊन मारुजी, हिंजवडी येथे रस्त्याचे कडेला थांबले असल्या बाबत बातमी मिळाल्याने खाली आरोपीना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या कडून खालील प्रमाणे देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले आहे.
आरोपी 1) रवी किंवा हनुमंत भोसले, वय 24 वर्ष, रा. बिल्डिंग नंबर सी 7 फ्लॅट नंबर 404, एक्झबिया सोसायटी, मारुंजी रोड, पुणे 2) अमित सुभाष साळुंखे, वय 20 वर्षे, रा. भरत ढाब्याजवळ धानोरी पुणे हे दि 23 नोव्हेंबर रोजी 5.00 वाजताच्या सुमारास एक्झबिया सोसायटी जवळ मारुंजी परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल व राऊंड घेऊन फिरत होते. याची माहिती गुन्हे शाखा युनिट 4 पिंपरी चिंचवडच्या पथकाला कळताच त्यांनी आरोपीवर धडक कारवाई करत 50,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व 1000 रूपये किमतीचे जिवंत काडतुसासह अटक केली आहे. तर एक आरोपी नयन बोंबाळे, रा. चाकण पुणे याचा शोध पोलीस घेत आहे.
सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी आरोपींना हिंजवडी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (25) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) सह 135 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती संतोष पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखा युनिट-4 पिंपरी चिंचवड यांनी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना दिली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…