ज्ञानप्रभात विद्या मंदिर व विद्यालय सह्योगनगर, पिंपरी चिंचवड पुणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्या मंदिर व विद्यालय सह्योगनगर रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सोनवणे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सर्वप्रथम सविंधान दिंडीचे पूजन व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संविधानच्या घोषणा दिल्या व घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर सामूहिक संविधान वाचन करण्यात आले तसेच या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधान निर्मिती व संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाषणातून अभिवादन केले. या प्रसंगी भाषणे कविता, नाटिका गीत यातून अभिवादन करण्यात आले.

संविधान दिनाचे औचित्य साधून इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी खूप छान नाटिकेतून संविधानाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रज्ञा सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. मनीषा कांबळे व कु. सलोनी खोले या १० वी च्या विद्यार्थिनींनी केली तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना कु. रसिका थोरात हिने केली व कु. प्रिती डावरे हिने सर्वांचे आभार मानले.

संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इयत्ता १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले व यशस्वी रित्या कार्यक्रम संपन्न केला त्यानंतर विद्यार्थ्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

4 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

16 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

16 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

16 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

16 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

16 hours ago