समता सैनिक दल मार्शल अभय कुंभारे हे आंबेडकरी कार्यकर्ता समर्पित गौरव पुरस्काराने सन्मानित.

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समता समता सैनिक दल द्वारा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्वेला कॉलनी, वर्धा रोड नागपूर येथे मार्शल एडवोकेट विमलसूर्य चिमणकर सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे यांना आंबेडकरी समर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्शल प्रकाश दार्शनिक राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख समता सैनिक दल, प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम आंबेडकरी चिंतक, देवेश चौधरी, संपादक तिसरा पक्ष, जबलपूर म.प्र, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम सेवानिवृत्त, मुख्य संयोजक -विहार, स्तुप, चैत्य एवं लेनी संवर्धन विंग. समता सैनिक दल, इजि. अरविंद मेश्राम अध्यक्ष बानाई नागपूर, इजि. पद्माकर पाटील, जलसंपदा मैत्री संघ नागपूर हे उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून सुधाकर सोमकुंवर, प्रकाशक, समता संगर प्रकाशन हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्र्यार्पण करण्यात आले त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून मार्शल एडवोकेट विमलसूर्य चिमणकर सर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मार्शल एडवोकेट मार्शल विमलसुर्य चिमणकर सर लिखित “दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर” या प्रसिद्ध अशा पुस्तकाच्या तिसऱ्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी केंद्रीय संघटक सुनील सारीपुत्त, राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख प्रकाश दार्शनिक, साहित्यिक विचारवंत रणजित मेश्राम यांच्या हस्ते अभय कुंभारे यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

“दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका” या विषयावर उपस्थित मान्यवरांनी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्शल दिलीप तायडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन आंध्र प्रदेश राज्य संघटक मार्शल मार्शल रोहन बोधी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार महाराष्ट्र सहसंघटक सहसंघटक मार्शल अनिकेत उबाळे यांनी मानले.

यावेळी मार्शल प्रदीप कांबळे, पुंडलिक गाडगे, लांबे, मार्शल चंदु भगत, मार्शल अमोल ताकसांडे, मार्शल मनोज थुल, मार्शल प्रिती आष्टेकर, मार्शल वंदना वासनिक, मार्शल आशिष पाटील, मार्शल अक्षय भगत, अर्पित वहाणे, निखिल खडसे, रोशन कांबळे, प्रा.विनोद राऊत, प्रा.ममता राऊत, तुळशीराम राऊत, अजय कुंभारे, विजय कुंभारे, मुख्याध्यापिका सविता कुंभारे, रघुनाथ पिंपळकर, मंगेश झामरे, संध्याताई झामरे, छाया पिंपळकर, वंदना वाघमारे, विनयराज वाघमारे आदींनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाला विविध राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

20 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

20 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

20 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

20 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago