“खुनाच्या गुन्हयात ४ महिने फरारी असणा या दोन आरोपीना कोंढवा पोलीसांनी उत्तर प्रदेश मधून केले जेरबंद”

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर गुरन.८९३/२०२३ भादवि कलम ३०२,३२४,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहेत. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी व सदर गुन्हयातील मयत सख्ये मावस भाऊ असून त्याचा फ्रेबरीकेशनचा व्यवसायातून वाद झाल्याने यातील फिर्यादी याना लाकडी बाबूने डोक्यात मारल्याने त्याना चक्क आल्याने ते खाली बसले त्याचा वाद सोडविण्यासाठी मयत इसम गेला असता त्याला सुध्दा दोन्ही पाहिजे आरोपीने हाताने व लाकडी बाबूने डोक्यात मारल्याने त्याला प्रथम उपचाराकामी माने हॉस्पीटल येथे नेले सदर ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर ससून हॉस्पीटल येथे अॅडमीट केले असता त्याचे डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर उपचारा दरम्यान मयत झाला आहे. त्याबाबत वरिलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयात आरोपी नामे सर्फराज उर्फ टारजन हबीब खान व तनवीर हबीब खान हे गुन्हा केल्यापासुन गेले ४ महिने फरारी होते. सदर आरोपी याचा तपास राजेश उसगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार ६४८४ मिसाळ, पोलीस अंमलदार ८३५२ महारनवर यानी आरोपीचे मोबाईल नंबरचे सीडीआर व एसडीआर च्या सहाय्याने त्याचे मूळ पत्ता राही रायबरेली इस्लामीया उर्दू स्कूलच्या जवळ नाहरीया जि. रायबरेली राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने वरिष्ठाच्या परवानगीने लखनऊ, राज्य उत्तरप्रदेश येथे जाऊन आरोपीचे दाजी याचेकडे जाऊन आरोपीबाबत चौकशी केली असता. त्यानी दोन्ही आरोपी त्याचे मुळ गावी असल्याचे सांगितल्याने. आम्ही नमुद आरोपीचा पत्ता राही रायबरेली इस्लामीया उर्दू स्कूलच्या जवळ नाहरीया जि. रायबरेली राज्य उत्तर प्रदेश सदरचे ठिकाण मिलएरिया पोलीस ठाणे, जि रायबरेली राज्य उत्तरप्रदेश अंतर्गत येत असल्याने. नमुद पोलीस ठाण्याकडील स्टाफ याचे मदतीने आम्ही व वरील स्टाफ असे आरोपीचे दिले पत्यावर शोध घेणेकामी गेलो असता. गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे तनवीर हबीब खान हा आम्हाला पाहून सदर ठिकाणावरुन जंगलात पळून गेला तसेच अपरात्र असल्याने आम्ही जंगलाच्या कडेला सर्व थांबून राहीलो. दिनांक २२/११/२०२३ रोजी सकाळी जंगलातून बाहेर आल्याने आम्हाला पाहून पुन्हा पळुन जावु लागला असता त्याचा सिने स्टाईल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेऊन मिलएरिया पोलीस ठाणे, जि रायबरेली येथे घेऊन आलो. त्याचेकडे पाहिजे आरोपी बाबत चौकशी केली असता त्याने सर्फराज उर्फ टारजन हबीब खान हा हिलगी जि रायबरेली येथे असल्याचे सांगितल्याने आम्ही

सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता सर्फराज उर्फ टारजन हबीब खान सदर ठिकाणी मिळून आल्याने त्याना रायबरेली उत्तरप्रदेश येथून कोंढवा पोलीस ठाणे येथे घेऊन आलो असता त्याना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

नमुद दाखल गुन्हयाचा पुढील तपास राजेश उसगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक हे करित आहेत. दिनांक २९/११/२०२३ रोजी पावेतो पोलीस कस्टडीमध्ये आहेत.

वरिलप्रमाणे कामगिरी ही मा. रितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा. रंजन शर्मा साो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. विक्रांत देखमुख, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा. शाहूराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे)व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सपोनि उसगांवकर, पोलीस हवालदार ६४८४ मिसाळ, पोलीस अंमलदार ८३५२ महारनवर यानी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

18 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

20 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago