पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघातील खाजगी जमिनीवर अतिक्रमण करून निर्माण करण्यात आलेल्या 55 झोपडपट्टीची जागा शासनाने निवासी कामाकरिता राखीव केल्याने या झोपडपट्टीत राहणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार असून त्यांना आता त्यांच्या जागेचे मालकी हक्क मिळणार आहे.
23 नोव्हेंबर 2023 रोजी यासंदर्भात एक महत्वपूर्ण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. खासगी जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांची जागा आता ‘बेघरांसाठी घरे’ किंवा ‘जनतेसाठी घर’ या योजनांसाठी राखीव घोषित केल्या आहेत. त्यामुळे खासगी जागांवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या 55 झोपडपट्ट्या नियमित होणार असून तेथे राहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे दिले जाणार आहे. जमिनीचे संपूर्ण कागदपत्रे नगररचना विभागाकडून महापालिकेकडे सादर केले जाईल. त्यानंतर तेथील जमिनीच्या विकास हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 55 पैकी 11 झोपडपट्ट्या शासकीय जागेवर असल्याने तेथील झोपडपट्टीवासीयांना 2018 च्या निर्णयानुसार पट्टेवाटप केले जाणार आहे.
2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पट्टे वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका आणि नझुलच्या जागेवर अतिक्रमण करून झोपड्या बांधलेल्या नागरिकांसाठी 2018 मध्ये झोपडपट्टीवासींना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता. आता 23 नोव्हेंबर 2023 ला काढलेल्या शासन निर्णयामुळे खाजगी जागेवर बसलेल्या झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहे. याचा फायदा लाखो झोपडपट्टीवासीयांना होणार आहे. त्यांना फक्त एक हजार रुपयात रजिस्ट्री करून देण्यात येणार आहे.
या झोपडपट्ट्या होणार नियमित:
शासनाच्या निर्णयाचा परसोडी, भामटी (नझुलच्या जागेवरील), अजनी, चिंचभवन (0.६५ हे.आर.), खामला, मौजा बोरगांव,मौजा हजारी पहाड,मौजा बाबुलखेडा, मानेवाडा,मौजा नागपूर, मौजा हरपूर कोड,मौजा बिडीपेठ, मौजा भानखेडा, मौजा हंसापुरी, जागृतीनगर, मौजा बिनाकी, मौजा चिखली (देवस्थान) मौजा भांडेवाडी, मौजा वाठोडा, मौजा नारी, वांजरा, मौजा जरीपटका, मौजा मानकापूर, मौजा पोलीस लाईन टाकळी, गोरेवाडा भागातील झोपडपट्ट्यांना लाभ होणार आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…