मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय जनता पार्टी हिंगणघाट वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत “घर तिथे रांगोळी” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत विविध प्रभागातील १०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
भाजपच्या वतीने “घर तिथे रांगोळी” स्पर्धेचे आयोजन तुळसकर सभागृहात करण्यात आले होते याचे उद्घाटन श्रद्धा कुणावार यांचे हस्ते झाले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. किरण वैद्य, रवी उपासे, नीलिमा तातेकर, वैशाली येरावार, शिवाजी आखाडे, अनिता माळवे, रवीला आखाडे, नलिनी सयाम, परीक्षक योगेश हेडाऊ व अर्चना डागा यांची उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. कुणावार यांनी महिला सशक्तीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांमुळे स्त्रियांची सर्वच क्षेत्रात उन्नती होत आहे. असे मनोगत व्यक्त केले.
सदर रांगोळी स्पर्धेत सहभागी तालुक्यातील विजेत्या स्पर्धकांची जिल्हास्तरावरील रांगोळी स्पर्धेत निवड होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल खंदार यांनी केले. संचालन शुभांगी डोंगरे तर उपस्थितांचे आभार पद्मा कोडापे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजना करीता सारिका उभाटे, शारदा पटेल, कौसर अंजुम, छाया सातपुते, धनश्री क्षीरसागर, रीना तुमडाम, रंजना साळवे, कीर्ती सायंकार, अर्चना येटीवार आदी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445338 / 7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…