पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमधील अवैध धंद्यांची माहिती काढून कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे अवैध धंद्यांची माहिती काढत असतांना पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे यांना बातमी मिळाली की, “आळंदी, मरकळ रोड, धानोरेफाटा येथील पत्र्याचे खोलीत एक इसम घरगुती भरलेल्या सिलबंद गॅस सिलेंडर मधुन छोट्या रिकाम्या ४ किलो च्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस अवैधरित्या रिफील करुन त्या विक्री करत आहे.” अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांना स्टाफसह रवाना केले.
खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी ०२ तास सर्च ऑपरेशन करुन एका पत्र्याचे खोलीत सुरु असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफीलींग करीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. छाप्यामध्ये इसम नामे संदीप नरसिंग लांडगे वय २४ वर्षे रा. देवनिवास बिल्डिंग, रुम नं.१ ठाकूरवस्ती, मरकळ रोड, आळंदी, पुणे हा मिळून आला. तसेच सदर ठिकाणी ६२,८००/- रु किं चा एकुण मुद्देमाल त्यामध्ये ०८ घरगुती वापराचे सिलेंडर, ०१ व्यवसायिक सिलेंडर, १३ लहान गॅस भरलेले सिलेंडर, ३७ रिकामे लहान सिलेंडर, ०५ पितळी रीफीलर नोजल, ०२ गॅस रिफिलिंग सर्किट असे साहित्य मिळून आल्याने ते जप्त करुन सदर इसमांविरुध्द आळंदी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३०९ / २०२३ भा.दं.वि कलम ४२०, २८५,२८६ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करुन, आरोपीस पुढील कार्यवाहीकामी आळंदी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, किरण काटकर यांचे पथकाने केली आहे.
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…
उषाताई कांबळे, सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दिनांक 23 डिसेंबर रोजी पारिघा…
जिल्हाधिकारी नागपूर यांना उपविभागीय अधिकारी सावनेर मार्फत निवेदन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश…