निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील भोयेगाव गाव हे धानोरा गडचांदूर मार्गावर असून या गावात मागील दहा वर्षापासून संदीप कोठारी यांचे डांबर प्लांट असून या डांबर प्लांटच्या घातक प्रदूषणामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एवढेच नाही तर लहान मुला बाळापासून वृद्धांपर्यंत अनेक आजाराने ग्रस्त झाले आहेत.
संबंधित डांबर प्लांट मालकाला वारंवार तक्रारी देऊनही तो प्लांट हटवायला तयार नाही. या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या शेतीतील मालाचे नुकसान होत असून प्लांट मालक या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. या संदर्भाची माहिती आम्ही आता पालकमंत्र्याला दिली असून संबंधित प्रदूषण विभागाला याबाबतची तक्रार करून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार. अन्यथा मी सरपंच शालिनीताई बोंडे आणि गावातील नागरिकाना घेऊन या डांबर प्लांटच्या विरोधात जन आंदोलन करू असे त्यांनी आज संबंधित माध्यमांना सांगितले.
याबाबतची माहिती संबंधित डांबर प्लॅन मधील मॅनेजर फुलझेले याला विचारणा केली असता. तो उलट तुम्ही छापून टाका! आमचे आतापर्यंत गाव वाल्याने काहीही वाकडे केले नाही तर तुम्ही बातमी टाकून काय वाकडे करणार! असा उद्धट सवाल माध्यमांना केला. संबंधित प्रदूषण विभागाचे अधिकाऱ्यांनी या डांबर प्लॅन मधून होत असलेल्या प्रदूषणावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…