अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सध्या वातावरणातील बदलामुळे अकोला सर्वोपचार रुग्णालयातील बालरुग्ण विभागात अनेक लहान मुले भरती असून वार्ड नंबर २३ मध्ये भरती असलेल्या एका सहा ते सात महिन्याच्या लहान मुलीचे उपचारादरम्यान घेण्यात आलेले ब्लड सँम्पल रुग्णालयातूनच गायब झाले. स़बधित डॉक्टरांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. असे अनेक चमत्कार सर्वोपचार रुग्णालयात घडत आहेत, असे प्रकार घडत असले तरी रुग्णालय प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सर्वसामान्य व गरीब रुग्णांसाठी आधार असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असून एका पत्रकाराच्या सहा ते सात महिन्याच्या लहान मुलीला उपचाराकरिता या ठिकाणी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान या लहान मुलीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले. परंतु हे ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर चमत्कारिकपणे गायब झाल्याचे पालकाचे म्हणणे आहे. या ब्लड सॅम्पलचा मुलीच्या पालकांनी शोध घेतला परंतु अखेरपर्यंत ते सापडले नाही. एवढेच नव्हे तर या बालकांना लागणाऱ्या आवश्यक औषधींचा तुटवडा सुद्धा निर्माण झाला असून रुग्णांच्या पालकांना खाजगी मेडिकल मधून औषध आणावे लागत आहे. अकोला सर्वोपचार रुग्णालयात सुरू असलेल्या या प्रकारावरून येथील भयावहता लक्षात येते. हा प्रकार थांबवण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पत्रकार असणाऱ्या या पालकावर जर ही परिस्थिती आली असेल तर सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांवर या ठिकाणी कशी उपचार दिले जातात हे स्पष्ट होते. त्यामुळे ब्लड सॅम्पल गहाळ प्रकरणी संबधित डॉक्टरांना तात्काळ निलंबित करा व त्यांना पाठीशी घालणाऱ्या विभाग प्रमुखांनवर कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक समिर खान, सतिश तेलगोटे, सुमित तेलगोटे, सुरज खंडारे आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 ! 7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…