डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- एका ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर चोळून तब्बल २७ लाख २५ हजार आठशे रुपयाची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली होती. या चोराना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे .या चोरट्यांकडून पोलिसांनी ११लाख ३५ हजार ४०० रोख रक्कम आणि इतर मालमत्ता असा एकूण २२ लाखाचा मुदेमाल हस्तगत गेला आहे. हे घटना निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत यमुना नगर परिसरात मंगळवारी (ता. १४) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.
ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची तक्रार ज्येष्ठ नागरिक प्रकाश भीमचंद लोंढा वय ६८वर्ष रा. एलआयसी कॉलनी सिंधू नगर प्राधिकरण निगडी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून सखोल तपासा करत पाच आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
आरोपी १) विशाल साहेबराव जगताप वय २५ वर्ष रा. श्रीराम कॉलनी टॉवर लाईन चिंचेचा मळा मोरे वस्ती चिखली मूळ पत्ता मु.पो. संक्रापूर ता. राहुरी जि.अहमदनगर २) लालबाबू बाजीलाल जयस्वाल वय २८ वर्ष रा. मोबाईल शॉपी राहणार मूळ बकरी बाजार तहसील भाटपरानी जिल्हा देवारीया राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार तुळजाभवानी चौक चिखली टॉवर लाईन ३)जावेद अकबर काशीबाई वय ५० वर्ष रा. फ्लॅट नंबर ४ ताजविस्टा किवळे देहूरोड ४)अभिषेक दयानंद बोडके वय १९ वर्ष रा. बोडके निवास माऊली हाउसिंग सोसायटी मोरे वस्ती चिखली ५)धीरेंद्र सिंग अश्विनी सिंग वय ३८ वर्ष रा.संगम हाउसिंग सोसायटी टॉवर लाईन मोरे वस्ती चिखली अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत तर इतर साथीदाराचा पोलीस शोध घेत आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मनी ट्रान्सफरची २७ लाख २५ हजार ८०० रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला निगडीतील यमुना नगर परिसरात लुटण्यात आले होते. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमानी या ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडावर मिरची पावडर टाकून हे कृत्य केले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पुणे शाखेच्या विविध पथक तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी जवळपास २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. चोरटे ज्या दिशेने पळून गेले ते ती दिशा व स्पॉट याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.
हा तपास सुरू असताना काही धागेदोरे हाती लागले, त्यानुसार पोलिसांनी विशाल जगताप यांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चोरी केलेल्या त्याच्या वाटेला आलेली ०८ लाख १ हजार ५०० रुपयाची रोकड मिळून आली. विशाल जगताप यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने त्याचे इतर साथीदाराची नावे सांगितली पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक करून ११ लाख ३५ हजार हस्तगत केली आहे. आरोपींनी बँक खात्यावर पाठवली रक्कम पोलिसांनी गोठवली आहे.
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, संतोष पाटील, निरीक्षक अमरीश देशमुख, उपनिरीक्षक इम्रान शेख, भरत गोसावी, गणेश माने, दरोडे विरोधी पथक युनिट १, २, ३, ४,खंडनी आणि विरोधी पथक व तांत्रिक विश्लेषण विभागातील अंमलदार यांच्या पथकाने मिळवून ही कारवाई केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…