हिंगणघाट शहर नशाखोरी: शहरात बिघडलेल्या श्रीमंतांच्या नशाखोर मुलांची विविध चर्चेला उधाण.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर ऐनकेन कारणाने प्रसिद्धीच्या झोतात असते. शांततेच्या व एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या हिंगणघाट शहरात शहरात विविध अंमली पदार्थांची नशा तरुणाई करून सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हिंगणघाट येथे नशेचा बाजार गरम असून, शेकडो तरुण नशा खोरीत आहारी गेल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

शहरातील तरुण नशेसाठी कुत्तागोळी (अल्प्राझोलम), दारू, चरस, गांजा, अफीम, एमडीएम पावडर असे विविध फंडे अवलंबत आहेत. तरुणांपाठोपाठ शालेय विद्यार्थी त्यात मागे नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या नशेचा विषय चिंताजनक आहे. तरुण व गुन्हेगार या नशा केल्यानंतर वाटेल ते करण्यास तयार असल्याच्या आर्विभावात वावरतात. नशेखोर गुन्हेगारांनी थेट खून केल्याचे प्रकारही घडले आहे. हिंगणघाट शहर नशाखोरीच्या एक घटनेने परत प्रकाश झोतात आले आहे.

हिंगणघाट शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेची चर्चा सर्रास रंगू लागली आहे. ज्यामध्ये आपण दररोज वृत्तपत्रांमध्ये व्यसनाधीनतेशी संबंधित वाढत्या घटना वाचत असतो. एमडी ड्रग्ज तस्करांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. आणि काही लोक अजूनही तुरुंगात आहेत. मात्र हे प्रकरण काही वेगळेच आहे, शहरातील काही धनदांडग्यांना नशेचे व्यसन असल्याचे शहरातील चर्चेत स्पष्टपणे बोलले जात आहे, याविषयी शहरातील जनतेलाही चांगलेच माहिती आहे. आणि त्यापैकी एक रईसजादा याला यापूर्वीही हिंगणघाट पोलिसांनी पकडले होते. मात्र काही स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे हे प्रकरण दडपण्यात आले. मात्र काही दिवसांपूर्वी हाच श्रीमंत धनदांडग्यांना पुन्हा ड्रग्जसह पोलिसांनी पकडला होता. मात्र हिंगणघाट पोलीस ठाण्यात या घटनेची कोणतीही माहिती नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली असली तरी त्यात मोठा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. आणि त्याच श्रीमंत धनदांडग्यांना आणि इतर मित्रांच्या सांगण्यावरून पोलिसांनी एक एक करून किमान 3, 4 धनदांडग्यांना बोलावून त्यांची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली, धमक्या दिल्या आणि या घटनेवर पडदा टाकला. मोठ्या रकमेचा व्यवहार केल्याचेही यावेळी शहरातील मेन लाईन मार्केट आणि पोलीस ठाण्यातही याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेबाबत वरिष्ठ अधिकारी अजूनही अनभिज्ञ आहेत का? की त्यांच्या माहितीतून ही घटना घडली आहे? हा चर्चेचा विषय आहे.

ही घटना ज्या प्रकारे व्यवहाराच्या रकमेची चर्चा होत आहे, ही घटना गंभीर आहे. या घटनेची वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेऊन चौकशी केल्यास दूध का दूध आणि पानी का पानी स्पष्ट दिसून येईल. ज्यामध्ये शहरात एमडीचा पुरवठा कोण आणि कोणत्या पद्धतीने करत आहेत आणि शहरातील तरुण पिढीचे भविष्य अंधकारमय बनवत आहेत, हे उघड होणार आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

8 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

20 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

20 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

20 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

20 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

20 hours ago