राजेंद्र विद्यालय भोयगांवचे मुख्याध्यापक विलास चटप व दिलीप पानघाटे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार.

निखिल पिदूरकर कोरपना तालुका प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोयगांव:- स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांवचे मुख्याध्यापक विलास शामराव चटप व दिलीप थामदेव पानघाटे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या विलास शामराव चटप व दिलीप थामदेव पानघाटे यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व भेट वस्तू देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुराचे अध्यक्ष वासुदेव पाटील झाडे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव उत्तमराव मोहितकर, सहसचिव मोतीराम पाटील उरकुडे, कोषाध्यक्ष मा. रमेशरावजी पिंपळशेंडे होते. सत्कार मूर्ती विलास शामराव चटप व सौ.उषाताई चटप आणि दिलीप थामदेव पानघाटे व सौ. मायाताई पानघाटे उपस्थित होत्या. तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष राजेंद्रजी वरारकर, सदस्य सर्वश्री विनोदजी भगत, विजय ताजने, शांतारामजी गोहणे, दिवाकर पा. बेरड, सुभाषजी पिंपळशेंडे उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त सत्कार समिती राजेंद्र विद्यालय भोयगावचे संयोजक जी. एम. लांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात श्री. जी. एम. लांडे यांनी शाळेतील भौतीक सुविधेबाबत शाळा व्यवस्थापणाचे लक्ष वेधले. तसेच सामूहिक जबाबदारीचे भान ठेवून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यानंतर सत्कार मूर्तींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तींच्या जीवन कार्याचा परिचय कु. व्ही. टी. वैद्य यांनी करून दिला. याप्रसंगी विद्यार्थींनी कु. मानसी राजेंद्र वरारकर तसेच श्री. यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे मा. रमेशजी पिंपळशेंडे यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी सत्कारमूर्ती विलास शामराव चटप यांनी संस्थापक मंडळ, सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. मोहितकर साहेब यांनी सत्कार मूर्तीने शाळेत केलेल्या सेवेबद्दल प्रशंसा केली. यापुढेही शाळेला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी सत्कार मुर्तीनी शाळेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. सदर कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन कु. एस. एन. गाडगे यांनी तर आभार ठाकरे सर यांनी मानले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

परतूर शहरातून गावठी बंदूक धारदार तलवार सह मोठा शास्त्र साठा जप्त, परतूर पोलिसांची धडक कारवाई.

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- दि. 14 सप्टेंबर रोजी…

3 hours ago

परतूर शहरातून मोठा शास्त्र साठा केला जप्त परतूर पोलिसांची कारवाई.

*जालना जिल्हा प्रतिनिधी रविंद्र भदर्गे* आज दि. 14/9/24 रोजी परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम.…

3 hours ago

मुलीने दिली जन्मदात्या आईच्या हत्येची मानलेल्या भावाला सुपारी, कारण आयकून बसेल धक्का.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- येथील पनवेल येथून…

3 hours ago

शिवसाई बजरंगं गणेश मंडळ व सूरज कुबडे मित्र परिवाराच्या वतीने जवानाचा सत्कार व भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील शिवसाई बजरंग गणेश मंडळ…

3 hours ago

हिंगणघाट येथे असलेल्या पाणपक्षी घरट्याची गणना निसर्गसाथी फाउंडेशनच्या उपक्रम.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- निसर्गसाथी फाउंडेशनच्या वतीने तहसील…

3 hours ago

हिंगणघाट येथील भवन्स येथील विध्यार्थी यथार्थ व अश्विन चे सुयश.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सिटी मॉन्टेसरी स्कूल, लखनऊ…

3 hours ago