अकोला: पोलीस आणि सैन्यात नोकरी लाऊन देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणाची फसवणूक.

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथील एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे पोलीस विभागात नोकरी लावून देण्याच्या नावावर तीन तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार उरळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस दलात आणि भारतीय सैन्य दलात नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवून आरोपीने अनेक तरुणाची फसवणूक केली. होमगार्डमध्ये कार्य करणाऱ्या एकाला आरोपीने महाराष्ट्र पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने नियुक्तीची खोटी कागदपत्रे खरे असल्याचे भासवून नोकरी करीता वारंवार नगदी व ऑनलाइनद्वारे एकूण 18 लाख रुपये घेतले. या शिवाय आणखी गावातील एका तक्रारदाराच्या मुलीला पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही 20 लाख 42 हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

आणखी एकाच्या तक्रारीनुसार एका युवकाला सैन्य दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर त्याच्याकडून एकूण 15 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तिघांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यांनी चौकशी अहवाल तयार करून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी उरळ पोलीस स्टेशन येथे 53 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

सावनेर येथे गणपती मूर्ती खरेदीवर लकी ड्रॉ चा वर्षाव.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील प्रसिद्ध मूर्तिकार…

8 hours ago

शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक उन्नती हेच माझे ध्येय: ऍड. संजय धोटे राजुरा मुक्तीसंग्राम दिन प्रतिपादन.

क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

9 hours ago

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावासाच्या निमित्त धम्मदेशना कार्यक्रम संपन्न.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती…

9 hours ago

ब्रिलीअंट सीबीएसई स्कूल हिंगणघाट येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट…

10 hours ago

गडचिरोली: ऊसाच्या शेतात जिवंत विद्युत प्रवाह साेडलेला तारांना स्पर्श झाल्याने 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातील देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा…

10 hours ago