सिंहगड रोड पोलीसांनी सराईत दिवसा घरफोडी करणा-या आरोपींच्या आवळल्या मुसक्या ३ लाख २० हजार रु चा मुद्देमाल जप्त. दोन गुन्हे उघड……

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-सदर बाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर २०२३ मध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडगाव या परीसरात दिवसा घरफोडी च्या घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा सिंहगड रोड पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व अमलदार हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे, गुप्त बातमीदारामार्फत तसेच सदर परिसरामधील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करुन आरोपीचा सखोल तपास करीत असताना सदरचा आरोपी हा मुंबई येथील सराईत घरफोडी चोरी करणारा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. सदर आरोपीचा मागोवा घेत असताना तपास पथकातील अंमलदार सागर शेडगे, देवा चव्हाण, अविनाश कोंडे हे सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत असताना त्यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिवसा घरफोडी करणारा इसम हा अंगामध्ये काळ्या रंगाचा टि-शर्ट व काळया रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेला रघुनंदन हॉल पुणे मुंबई बेगलोर हायवे चे सर्व्हिस रोडवर पडीक मोकळ्या जागेच्या समोर सार्वजनिक रोडवर थांबलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सपोनि सचिन निकम यांनी सोबतच्या स्टाफ सह सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन बातमीतील वर्णनाचा इसम आहे का, याबाबत खात्री केली असता बातमीतील वर्णनातील एक इसम उभा असल्याचे दिसला. सदर इसमाला आमची येण्याची चाहुल न लागु देता त्याला आहे त्या परिस्थीतीत वरील स्टाफचे मदतीने दि. २१/११/२०२३ रोजी २१.१५ वा. ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता रोहित चेतन शेट्टी वय २७ वर्षे, रा. ०८ एनआर १ आगासन रोड, जवळ शॉपर्स स्टॉप, दिवा ठाणे. सध्या रा. रुम नं.४ हिना पार्क रोड, एचपी पंपाजवळ शिळफाटा, ठाणे. असा असल्याचे सांगितले, त्याचेकडे विचारपुस करता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवुन काही एक उपयुक्त माहीती सांगत असल्याने त्याचेकडे जागीच येथे येणेबाबत सखोल तपास करता त्याने चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास दि. २१/११/२०२३ रोजी २२/१० वा. अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांच्याकडे तपास करता त्याने चोरी केलेले दागिणे त्यांची मैत्रीण नामे आलिझा ताहीर सय्यद वय २२ वर्षे रा. मुंबई हीच्याकडे विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. सदर महीलेस अटक करुन त्यांच्याकडे पोलीस कस्टडी मध्ये तपास करता त्यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथील दोन गुन्ह्यातील मुद्देमाल मुंबई येथे विक्री केल्याचे सांगितल्याने मुंबई येथे जावुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील दोन गुन्ह्यातील ३,२०,०००/- रुपये किंमतीचे ९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी नामे रोहीत चेतन शेट्टी यांच्यावर मुंबई व पुणे या शहरात घरफोडीचे एकुण १४ गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपीकडुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील दोन गुन्ह्याची उकल करण्यात आली असुन

दाखल गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक, सचिन निकम सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. सुहेल शर्मा साो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३ श्री आप्पासाहेब शेवाळे सो सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, श्री अभय महाजन सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सो पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, सागर शेडगे, अविनाश कोंडे, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील यांचे पथकाने केली

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

11 mins ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

25 mins ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

1 hour ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

2 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 hours ago