हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील आदिवासी समाजाला न्याय दयावा प्रशासनाकडे मागणी.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर येथे सर्व नागरिक सर्वधर्म समभाव या भावनेने एकोप्याने राहतात. वडनेर गावांमध्ये सर्व धर्माचे प्रेरणास्थान आहे परंतु आदिवासी समाजाचे कुठेही प्रेरणास्थान नाही याकरिता दिनांक 25 नोव्हेंबरला सर्व आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडा आदिवासी समिती द्वारा ग्रामपंचायत वडनेरला निवेदन देण्यात आले की आंबेडकर वार्ड येथील जुनी ग्रामपंचायतची जागा आहे त्या जागेवर समाजाचा झेंडा लावण्याची परवानगी व ती जागा द्यावी अशी मागणी केली होती.

त्यानंतर दिनांक 28 नोव्हेंबरला मासिक मीटिंग मध्ये तो अर्ज सर्वानुमते मंजूर करण्यात आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 29 नोव्हेंबर मध्यरात्री दोन वाजता त्याच झेंड्यासमोर शीख समुदायाच्या बांधवांनी त्यांचा झेंडा कोणाचीही परवानगी न घेता लावण्यात आला तसेच दिनांक 30 नोव्हेंबरला ग्रामपंचायत कार्यालय वडनेर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्या ग्रामसभेला वडनेर येथील 200 ते 250 नागरिक उपस्थित होते त्या सर्वांसमोर ग्रामपंचायतच्या जुन्या जागेवर आदिवासी समुदायाचा झेंडा लावण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला तसेच सिख समुदायातील बांधवांनी लावलेला झेंडा तेलाच्या पिप्यामध्ये लावण्यात आलेला आहे आता वातावरण असे आहे की तो झेंडा कधीही पडू शकतो त्यामुळे समाजामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याकरिता सर्व बिरसा मुंडा आदिवासी सेवा समितीच्या सदस्यांनी याकरिता दिनांक 1 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत वडनेर पोलीस स्टेशन वडनेर तहसीलदार व गटविकास अधिकारी आणि आमदार समीर कुणावर हिंगणघाट उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना आमच्या झेंड्याच्या बाजूला लावलेला शीख समुदायाचा झेंडा कोणतीही परवानगी न घेता लावण्यात आलेला आहे. लावलेला झेंडा तात्काळ काढावा यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे.

वडनेर गावामध्ये शिख बांधवांचे मोठे गुरुद्वारा बांधलेले आहे. परंतु आदिवासी समाजाचे कुठेही प्रेरणास्थान नाही आणि ग्रामपंचायत वडनेर ने ठराव मध्ये मंजूर करून दिलेली जागा असून यामध्ये सुद्धा शीख समुदायातील बांधव द्वेषामुळे आदिवासी बांधवांमध्ये अडचणी निर्माण करत आहे. यामुळे समाजामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो यावर तात्काळ निर्णय द्यावा व कारवाई करावी अशे निवेदन शासनाला दिलेले आहे. यावेळी निवेदन देतेवेळी 150 ते 200 आदिवासी बांधव उपस्थित होते. विनापरवानगी लावलेला झेंडा तात्काळ काढून आदिवासी समाजाला न्याय द्यावा अन्यथा आदिवासी समाज आंदोलनाचा मार्ग पत्करल्या शिवाय राहणार नाही अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

4 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

6 hours ago