“मौजमजेसाठी चोरीच्या मो/ सा विक्री करणाऱ्या (एजन्ट) आरोपीकडुन १५ मो/ सा कोंढवा पोलीसांकडुन जप्त “

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना पो अं विकास मरगळे, राहुल थोरात, जयदेव भोसले यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निखील सुनिल राक्षे, रा. प्रेमनगर मार्केट यार्ड पुणे हयाच्याकडे एक होन्डा शाईन मोटार सायकल असुन त्याच्यावर नंबर प्लेट नाही सदर गाडी ही चोरीची असुन तो ती विक्री करण्यासाठी बोपदेव घाट या ठिकाणी जाणार आहे त्यावेळी बोपदेव घाट याठिकाणी वरील स्टाफच्या मदतीने सापळा रचुन ताब्यात घेवुन त्याचेकडे मिळुन आलेल्या मो/शा बाबत तपास केला असता त्याने सदर मो/सा हि त्यास महेश बकाण नावाच्या इसमाने चोरी करून विक्री करीता दिली आहे. तसेच तो सदर चोरीची गाडी विक्रीसाठी तो ग्राहक शोधत असल्याची कबुली दिली.

सदर आरोपी याने चोरीच्या मो/ सा विक्री केल्याचा संशय असल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास पोलीसी खाक्या दाखवुन सखोल तपास केला असता त्याने महेश चव्हाण याने त्यास २ बुलेट, २ यमाहा १ केटीएम, ३ युनिकॉर्न २ अॅक्टिव्हा १ शाईन अशा मो/ सा त्यास महेश चव्हाण याने चोरी करुन विक्री करीता दिल्याची माहिती दिली त्याने काही मो/ सा हया इंदापुर भागातील शेतकरी लोकांना कागदपत्रे नंतर देतो असे सांगुण विक्री केल्याचे सांगितले सदर गाड्या विकत घेणाऱ्या व्यक्तीकडुन जप्त करण्यात आल्या तसेच काही दुचाक्या ग्राहक मिळे पर्यंत रोडलगत ठिकठिकाणी सोडल्या होत्या त्या गाडया जप्त करण्यात आल्या आहेत. एकुण ११ मो/सा विक्री करण्यासाठी महेश चव्हाण याचेकडुन घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन ५.५०,०००/- रुपये किमतीच्या एकुण ११ मो / सा जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीला विश्वासात घेवुन आणखीन तपास केला असता त्याने सागर शिवाजी गुजले रा- माण सातारा याचेकडे हि १ युनिकॉर्न २ पल्सर मो / सा तसेच गणेश भरत मोहिते, रा.ता.माण जि.सातारा पुणे याचेकडे १ चोरीची सलेन्डर मो/ सा असुन त्याचे विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या अनुषंगाने सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन हि १,५०,०००/- रुपयाच्या ३ मो/ सा हया जप्त करण्यात आल्या आहेत. वरील तीनही आरोपीकडुन खालील प्रमाणे मो/ सा चोरीचे गुन्हे उघड झाले आहे..

१ ) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ९१९ / २०२३ भादंवि कलम ३७९,३४.४
२) वानवडी पो ठाणे गुरन. ५५९/२०२३ भादवि. ३७९
३) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. १०४१ / २०२३ भादवि कलम ३७९,
४) राजगड पोलीस ठाणे पुणे गुरन ६५४ / २०२३ भादवि कलम ३७९.
५) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ९७७ / २०२३ भादवि कलम ३७९,
६) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ११७५/२०२३ भादवि कलम ३७९,
७) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन.६३५ / २०२३ भादवि कलम ३७९
८) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ३७६/२०२३ भादवि कलम ३७९, ९) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन १००० / २०२३ भादवि कलम ३७९
१०) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ७६९/२०२३ भादवि कलम ३७९
११) माणगांव रायगड / माणगांव गुरन. ५५/२०२३ भादवि कलम ३७९
१२) महाळुगे एम.आई.डी. सी. पोलीस ठाणे येथे गुरन ७३३ / २०२३ भादवि कलम ३१७९
१३) वाठार सातारा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन १४५/२०२३ भादवि कलम ३७९
१४) सासवड पोलीस ठाणे ग्रामीण पुणे येथे गुरन ७७०/२०२३ भादवि कलम ३७९

सदर आरोपीत यांचेकडुन वरील गुन्हयामधील १४ वाहने जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांचेकडुन जप्त करण्यात आलेल्या यमाहा मो/ सा बाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. सदर मो/ सा बाबत अधिक तपास करीत आहोत.

सदर कामगिरी ही मा. रितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. रंजन शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा.विक्रांत देखमुख, पोलीस उप आयुक्त सो परि०५ मा. शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पो. हवा. २८३ अमोल हिरवे, मो हवा ६९४६ राहुल वंजारी पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. १००२६ राहुल थोरात, पो.शि.८६४६ जयदेव भोसले, पो.शि. ९१२६ विकास मरगळे, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो.शि. ८७५१ शशांक खाडे, पो.शि. ८५०४ आशिष गरुड, पो.शि. ५७८. रोहित पाटील यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

1 min ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

6 hours ago