वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- शुक्रवारी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, मंत्री जेष्ठ नेते आणि जिल्हाध्यक्ष या विचार मंथन शिबिरात उपस्थित होते.
यावेळी वाशिम जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी, जिल्हाध्यक्षा महिला सीमाताई सुरुशे, जेष्ठ नेत्या सोनालीताई ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वाशिम जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी, जिल्हाध्यक्षा महिला सीमाताई सुरुशे, जेष्ठ नेत्या सोनालीताई ठाकूर यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. यावेळी वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या बरोबर वाशिम जिल्हात घरकुल योजना, रस्ते बांधकाम, महिला सुरक्षा, स्वच्छता अभियान यावेळी वाशिम जिल्ह्यातील विकास कामासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्यावी देण्यात आली.
आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा, नगर पालिका जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येणार असे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेत्यांनी केले. त्यामुळे अजित पवारांशी झालेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
वाशिम जिल्हातील प्रत्येक तालुक्यात विविध विकास कामांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी, जिल्हाध्यक्षा महिला सीमाताई सुरुशे, जेष्ठ नेत्या सोनालीताई ठाकूर या सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. या माध्यमातून ते विविध विकास कामे मार्गी लावून त्यांनी मोठ्याप्रमाणात निधी मिळावा म्हणून आग्रह केला आहे.
कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिबिर झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गौरवशाली वाटचाल सुरू आहे. यंदा हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात झाले. हे शिबिर महाराष्ट्रात पुरतेच मर्यादित न राहता देशाच्या राजकरणात अजित पवार नावाचा झंझावातची नव्याने वेगळी ओळख निर्माण करेल अस विश्वास आहे. हाजी मो. युसुफ पुंजानी
दरम्यान, वाशिम महिला जिल्हाध्यक्षा सीमाताई सुरूशे यासंदर्भात महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ही भेट विकास कामांच्या संदर्भात होती. वाशिम जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या निमित्ताने ही भेट होती.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…