गुंडा विरोधी पथकाची उत्कृष्ठ कामगिरी महींद्रा अॅन्ड महींद्रा कंपनीमागे मोकळया जागेतील खुनाचे तीन आरोपी ४८ तासांचे आत घेतले ताब्यात.

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

गुंडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. २९/१२/२०२३ रोजी महींद्रा ॲन्ड महींद्रा कंपनीच्या गेट नं. ८ जवळ मोकळ्या जागेत एक वय ३० ते ३२ वर्षे वयाचा अनोळखी नग्ण इसम जखमी व मृत अवस्थेत मिळुन आल्याने महाळुगे (इंगळे) पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ८०० / २०२३, भा.द.वि. कलम ३०२ २०१ प्रमाणे अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदरचा गुन्हयातील अज्ञात आरोपींचा तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यानी दिले होते.

गुडा विरोधी पथकातील अधिकारी व अमलदार हे आरोपींचा शोध घेत असताना दाखल गुन्हयातील मयत इसमाचे हातावरील बंजारा अशा गोंदणवरुन सदरचा इसम हा लमाण समाजाचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले, मयत इसमाचा साथीदार ड्रायव्हर नामे रोहीदास राजेंद्र चव्हाण वय ३० वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. मु. होळी, पो. पेठ सांगवी ता. लोहारा, जि. धाराशीव याचेकडे केलेल्या तपासावरुन सदर मयताचे नाव अमोल विकास पवार, रा. नादुरागा तांडा, ता. औसा जि. लातूर असे असल्याचे समजले. त्यानंतर प्रथम ट्रान्सपोर्ट नगर, निगडी, पुणे येथून ते गुन्हयाचे घटनास्थळापर्यंतचे सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक करुन सदरचा मयत इसम हा के.एस.बी. चौक, चिंचवड येथे एका ट्रेलरमध्ये चढताना दिसुन आला. त्या ट्रेलरचे नंबरवरुन सदरचा ट्रेलर हा भारव्दाज ट्रेलर सव्र्हसेस यांचा असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यांचेकडे तपास करता सदर ट्रेलरवरील ड्रायव्हर १) विष्णु अगद राऊत, २) दुसरे ट्रेलरवरील ड्रायव्हर विष्णु राऊत याचेबरोबर इतर साथीदार ड्रायव्हर नामे दशरथ ऊर्फ सोनू जयराम आडसुळ व त्याचा मित्र ३) बलराम जमदाडे हे ट्रेलर पार्क करुन जेवण करण्याकरीता गेले असताना इसम अमोल पवार याने त्यांचा ट्रेलर चोरी करुन घेवुन जात असताना त्यांनी त्यास पकडले व त्याच ट्रेलरमध्ये घालून जबर मारहाण करुन त्यास महींद्रा अॅन्ड महींद्रा कंपनीच्या गेट नं. ८ जवळ मोकळया जागेत नेवुन टाकुन दिले. ड्रायव्हर विष्णु अंगद राऊत व सोनू जयराम आडसुळ हे आपआपले ट्रेलर घेवुन मुंबईच्या दिशेने गेल्याचे समजले. दोन्ही ट्रेलरचे जी.पी.एस. सीस्टीम व्दारे माहीती घेतली असता एक ट्रेलर हा कळबोली जि. रायगड येथे व दुसरा ट्रेलर हा बोईसर जि. पालघर येथे असल्याचे समजलेने गुंडा विरोधी पथकाच्या दोन स्वतंत्र टिम तयार करुन लागलीच वरीष्ठांचे आदेशाने दोन्ही ट्रेलरच्या दिशेने रवाना करून निष्पन्न आरोपी नामे दशस्थ ऊर्फ सोनू जयराम आडसुळ, वय २१ वर्षे, रा. मु. कामठा, पोस्ट आपसिंगा, ता. तुळजापुर, जि. धाराशिव यास कळंबोली जि. रायगड येथुन व निष्पन्न आरोपी विष्णु अंगद राऊत, वय २९ वर्षे, रा. मु. पो. नालवंडी, ता. व जि. बीड यास बोईसर जि. पालघर येथून ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे तपास करुन त्यांचा साथीदार बळीराम वसंत जमदाडे, वय ३५ वर्षे, रा. मु. कामटा, पोस्ट हापसिंगा, ता. तुळजापुर, जि. धाराशिव याचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्या नंबरचे केलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन त्यास शशीकांत जाधव यांचे घरात भाडयाने विठठलवाडी, देहुगाव, पुणे येथून ताब्यात घेवुन महाळुगे ( इंगळे) पोलीस ठाणेच्या ताब्यात पुढील कारवाईकरीता देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे). सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) बाळासाहेब कोपणार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने पोलीस अमलदार हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, – विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा रामदास मोहीते, शुभम कदम. तौसीफ शेख व टी. ए.डब्ल्यु. चे नागेश माळी यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

7 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

7 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

7 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

7 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

8 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

8 hours ago