अहेरी उपविभागात रेपणपल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील कोडसेलगुडम येथे कोंबडा बाजार जोमात तर पोलीस प्रशासक कोमात
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील अहेरी उपविभागात येणाऱ्या रेपनपल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोडसेलगुडम गावात कोंबडा बाजार हा रविवारी भरविले जात असतो. या कोंबडा बाजारावर कोणाचाहीच लक्ष कसे जात नाही, हा मात्र चिंतनाचा आणि गंभीर विषय आहे.
कोंबडा बाजार असला की या ठिकाणी रविवारला मोठ्या प्रमाणात लोकं गर्दी करत असतात. हजारो रुपयांची यामध्ये सट्टेबाजी होत असते. एका कोंबड्याचा यात जीव सुद्धा जात असते. सदर प्रकार हे कायद्याने गुन्हा असला तरी हा खेळ राजरोसपणे या परिसरात चालू असताना रेपनपल्ली पोलिसांनी कानाडोळा का बर केला जातो ? हा मात्र प्रश्न उपस्थित झाला आहे.
रेपणपल्ली पोलीसचे काही लोकं मुद्दामहून हप्ते घेऊन डोळे झाक करत असल्याचीही परिसरात एकीकडे सुशासन आणि प्रशासनाचे दिंडोरे पिणाऱ्या पोलीस विभागातला कोडसेलगुडम येथील कोंबडा बाजार कसा दिसत नाही? हा मात्र मोठा प्रश्न आहे. एखाद्याने आवाज उठवला तर त्याचाच गेम करण्याची ही यंत्रणा सुद्धा पोलिसांकडे तयार असते. त्यामुळे सहसा या बाबीला कोणीही आवाज उठवत नाही. परंतु कोंबडा बाजारामुळे अनेक सट्टेबाजांचे घर उध्वस्त झाले आहेत, हे मात्र सत्य आहे. कोंबडा बाजार भरवणे हे कायद्याने गुन्हा असताना सुद्धा रेपणपल्ली पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर एवढा मोठा कोंबडा बाजार भरतोच कसा हा मात्र प्रश्न पडला आहे. याकडे गांभीयाने लक्ष देऊन अवैध धंदे बंद करण्यात यावी.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…