महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील इंग्रजी माध्यम कॉमर्स विभागातर्फे दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ला दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा त्यांच्याच अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात आली. या परीक्षेमध्ये बल्लारपुरातील एकूण 12 शाळांचे 210 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिनांक 3 डिसेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

या सोहळ्याकरिता प्रमुख अतिथी बल्लारपूर पब्लिक स्कूल एनबोडीच्या प्राचार्या सुधा देशमुख उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लाभे सर यांनी भूषविले. तर प्रास्ताविक अकरावी कॉमर्स विभागातील इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी कु. जेसिका मातंगी हिने केले. या कार्यक्रमाचे कु. संचालन गायत्री पांबी हिने केले. या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी माता सरस्वतीच्या पूजनाने झाली.

यावेळी प्रमुख अतिथीने आपल्या भाषणामध्ये दहाव्या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची परीक्षा पुन्हा आयोजित करावी असे आयोजकांना म्हटले. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे जेणेकरून दहाव्या वर्गाचा त्यांचा निकाल उत्कृष्ट लागेल असेही सांगितले. या परीक्षेमध्ये प्रथम पुरस्कार विद्याश्री कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी कु. अक्षता हमंद हिने प्राप्त केला. तसेच द्वितीय पुरस्कार माउंट इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी कु. मानसी भटारकर हिने प्राप्त केला. तृतीय पुरस्कार साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंटचा विद्यार्थी कुणाल राखुंडे याने प्राप्त केला. चौथा पुरस्कार बल्लारपूर पब्लिक स्कूल एनबोडी ची कु. भाग्यश्री मारोटकरने प्राप्त केला. पाचवा पुरस्कार सेंट पॉल कॉन्व्हेंटचा विद्यार्थी सोहम शेरकी आणि दिलासाग्राम कॉन्व्हेंटची कु. योग्यता राऊत यांनी संयुक्तपणे प्राप्त केला.

यानंतर प्रोत्साहनपर पुरस्कार एम.जे.एफ हिंदी/उर्दू/तेलगू शाळेचा संकल्पदीप निषाद, न्यू इंडिया कॉन्व्हेंटचा जय वनकर, श्री बालाजी हायस्कूल बामणीची वैष्णवी पराडकर आणि सर्वोदय विद्यालय बल्लारपूरचा निलय रंगारी यांनी प्राप्त केले. हे बक्षीस वितरण झाल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पुन्हा एक परीक्षा लगेच घ्यावी अशी विनंती आयोजकांना केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

1 day ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 days ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago