उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जग 21 व्या शतकात आहे. आज पण करणी भानामती सारखे प्रकार समोर येत आहे. अशीच एक खळबळजनक घटना सांगली जिल्हातून समोर आली आहे. मरण पावलेल्या सवतीने केलेली करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कारंदवाडीच्या प्रकाश विष्णू शेंबडे पाटील उर्फ मामा याची भांडेफोड करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आष्टा पोलीस यांनी स्टिंग ऑपरेशन करून त्याची पोलखोल केली. प्रकाश पाटील उर्फ मामावर आष्टा पोलिसांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कारंदवाडी येथे प्रकाश विष्णु शेंबडे पाटील ऊर्फ मामा हा त्याच्या राहत्या घरी दर गुरूवारी, रविवारी आणि अमावस्येच्या दिवशी दरबार भरवून लोकांच्या समस्यांवर दैवी, अघोरी व जादुटोणा करुन उपाय सुचवून अंधश्रध्दा पसरवितो अशी एक निनावी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडे महिन्याभरापूर्वी आली होती. त्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका महिला कार्यकर्त्याला डमी भक्त म्हणून कारंदवाडी येथे पाटील मामा याच्या दरबारात पाठवले.
ती डमी भक्त दरबारात गेल्यानंतर काय त्रास आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा “माझी मयत सवत माझ्या स्वप्नामध्ये येते व मला त्रास देते व माझ्या अंगातुन प्रचंड वेदना होतात” असे त्या डमी भक्ताने खोटंच सांगितलं. त्यानंतर मामा यांनी भंडा-याचे रिंगण काढुन, त्या डमी भक्त महिलेच्या कपाळावर भंडारा लावुन सुमारे तासभर तिथे बसविले. त्यादरम्यान भंडारा घातलेले एक ग्लास पाणी पिण्यास दिले व तुम्हाला पाच रविवार माझ्याकडे दरबारात यावे लागेल, मग तुम्हाला बरं वाटेल, असं सांगितलं. यावरूनच पाटील ऊर्फ मामा हा अंधश्रद्धा पसरवत असल्याबाबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीची खात्री झाल्याने कार्यकर्त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात जाऊन माहिती नोंदवली.
आष्टा पोलिसांनी अंनिसच्या महिला कार्यकर्त्या सोबत साध्या वेशात पोलीस पाठवला. ते दोघेही दरबारात पोहोचले. तेव्हा त्या डमी महिला कार्यकर्त्याने माझा त्रास वाढल्याचे सांगितले. त्यावर त्या पाटील उर्फ मामांनी पुन्हा तसेच रिंगणात बसवले आणि तुम्हाला बरे वाटेल असे सांगीतले. त्यानंतर त्यांनी मंतरलेला ताईत दिला व डॉक्टरांची औषध घेवू नका म्हणून सांगीतले. इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवण्यास सांगितले.
याच दरम्यान आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे मामाच्या दरबारात दाखल झाले. त्यावेळी प्रकाश मामा लोकांच्यावर अघोरी दैवी उपाय करत होता. दैवी अघोरी उपायासाठी वापरणारे ताईत गंडेदोरे भंडारा लिंबू अशा वस्तूंचा सविस्तर पंचनामा करुन पोलिसांनी त्या संबंधीत वस्तू जप्त केल्या आहेत. पोलीसांनी त्या मामांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…