हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा या मागणीला घेऊन भीमशक्ती च्या वतीने 13 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संविधानिक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळा बाबुपेठ, चंद्रपूर येथुन होईल.
राष्ट्रीय समस्या घेऊन या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी अपेक्षा पिंपळे, भिमशक्ती महिला अध्यक्ष विदर्भ प्रदेश, सरोज पुनवटकर, महिला अध्यक्ष जिल्हा चंद्रपूर, पंकज भरणे, अध्यक्ष जिल्हा चंद्रपूर, कुणाल गायकवाड, कार्याध्यक्ष जिल्हा चंद्रपूर, माया मेश्राम कार्याध्यक्ष जि. चंद्रपूर, पियुष धुपे, महासचिव जि. चंद्रपूर, प्रदिप कवटे, संघटक जिल्हा चंद्रपूर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली.
शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे भारताची भावी शैक्षणिक पिढी उध्वस्त होत आहे. ती गुलाम होण्याच्या पाऊलवाटेवर उभी आहे. तेव्हा विद्यार्थि पालक व शिक्षकांनी या राष्ट्रीय मोर्चात सामिल व्हावे. हि काळाची गरज आहे. शिक्षणाचे खाजगीकरण हे भारतीय समाजात सामाजिक, आर्थिक विषमता निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. शिक्षणाचे खाजगीकरण हे समाजात अंधश्रध्दा कायम ठेवण्याचे षडयंत्र आहे. शिक्षणाचे खाजगीकरण म्हणजे भारतीय लोकांची वैज्ञानिक दृष्टी नष्ट करून वैदिक अभ्यासक्रम अमलात आणण्याचे षडयंत्र आहे. समस्त अनु. जाति, अनु. जमाति, भटक्या जाति, विमुक्त जमाति, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबिसी समाजाचे संविधानिक हक्क व आरक्षण संपविण्याचे षडयंत्र आहे.एकंदरित शिक्षणाचे खाजगिकरण हि सरकारची संविधान विरोधि भुमिका आहे. त्यामुळे शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे म्हणजे शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी असे आहे, सरकारने समान शाळा, समान शिक्षण व समान वातावरणातील शिक्षण सुरू करावे, अ. जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रूपये १५०० कोटी सरकारने त्वरित वितरीत करावी, कंत्राटी पध्दत बंद करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे. अश्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन हा मोर्चा निघेल.
सर्व बहुजन समाजाला यात सक्रिय सहभागाचे आवाहन अॅड. शाम खंडारे, पारस अलोने, सुनिल गुढे, शैलेश करवाळे, विनोद लभाने, जितेंद्र पाझारे, सुभाष खाडे, मनोहर डोर्लीकर, प्रकाश भाले, विजय इंदुरकर, सुनिल कांबळे, संदीप उराडे, दयाळ शेंडे, गणेश मेश्राम, लक्की पिंपळे, बबन मगरे, राजेश दुधे, निखील कांबळे, गणेश कजले, सिध्दांत गोरे, क्विंटन थुल, पवित्र पडोळे, विनोद दवने, प्रतिक्षा पाटील, साधना बारसागडे, वर्षा वाघाडे, अनिता ढोरे, अल्का जगझापे, कोमल बोरकर, सुजाता नळे, माधुरी रामटेके, वनश्री कांबळे, प्रियंका ब्राम्हणे, रमा मेश्राम, सरोज निखाडे, वनश्री वनकर यांनी केले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…