प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर येथील गुरुद्वारा श्री गुरुनानक संघ साहेब प्रबंध कमेटी वडनेर तथा सर्व सदस्य व ट्रस्ट संचालक सिख- सिकलगर समुदाय मागील ७० ते ८० वर्षा पूर्वी पासून मोजा वडनेर या गावांमध्ये राहत आहो व मागील ४० वर्षा पासून सिख-सिकलगर समाजाचे धार्मिक स्थान गुरुद्वारा वडनेर गावामध्ये त्या जागेवर आहे मागील ४० वर्षा पासून गुरुद्वारामध्ये किंवा या परिसरात आमचे धार्मिक, सांस्कृतिक व अश्या अनेक प्रकारचे वर्षातून बारा ते पंधरा कार्यक्रम होत असते.
आमचे सांगायचे तात्पर्य हे आहे की गुरुद्वारा परिसरातील लागूनच ग्रामपंचायतची जागा आहे व मागील पंधरा ते वीस वर्षापासून आमच्या कमेटीचा ताब्यात व वापरण्यात आहे. त्या जागेवर आमचे धार्मिक संस्कृती व कोणतेही कार्यक्रम असल्यास आम्ही तिथे स्वयंपाक किंवा महाप्रसाद (लंगर) बनवत असतो ती जागा या कामासाठी वापरण्यात येते.
आज पर्यंत ग्रामपंचायत वडनेर यांचे कडून कार्यक्रमाला व सदर जागा वापरण्यात बाबत कोणत्याही प्रकारची नोटीस बजवले नाही. व कोणत्याही प्रकारची कागदपत्रे कारवाई केलेली नाही, परंतु आता त्या जागेवर घडलेले धार्मिक कार्य असे की दिनांक २७/११/२०२३ रोजी मध्यरात्री गुरुनानक जयंतीच्या कार्यक्रम आटोपल्या नंतर आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना न करता व माहिती न देता आदिवासी समाजाच्या नागरिकांनी मिळून विद्यमान व कार्यरत असलेला सरपंच सौ कविता वानखेडे यांचे पती माजी सरपंच विनोद वानखेडे यांचे मदतीने तिथे आदिवासी समाजाच्या झेंडा रोवण्यात किंवा लावण्यात आला व तसेच आमच्या कमिटीच्या लोकांनी सुद्धा विनोद वानखेडे यांनी झेंडा लावण्यात करिता सांगितले.
ज्या लोकांना सांगितले त्या लोकांच्या मनात धार्मिक उद्देश आणून जातीवाद लावण्याचे प्रयत्न केले माजी सरपंच विनोद वानखेडे यांच्या उद्देश असा आहे की समोर असलेली निवडणूक त्याकरिता असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य केले तर दोन समाज मध्ये वाद विवाद व्हावा व ते निर्माण झाली पाहिजे माजी सरपंच विनोद वानखेडे यांचे पूर्वीचे ५ वर्षाचे कार्यकाल व विद्यमान असलेला सरपंच सौ कविताताई यांचे मागील जवळपास पाच वर्षाच्या कार्यकाल मध्ये या आदिवासी समाज बद्दल कोणताही प्रकारची सामाजिक व धार्मिक आपुलकी दिसली नाही, मागील दहा वर्ष मध्ये आदिवासी समाजाचे मंदिर किंवा बिरसा मुंडा भवन बनला पाहिजेन हे उद्देश किंवा त्यांची नीती दिसली नाही त्याचा एकच उद्देश फक्त व फक्त समोर असलेली निवडणूक आदिवासी समाजाचे मंदिर व भवन व्हावे व बन्याकरिता आमच्या कमेटी कडून कोणत्याही प्रकारचे नकार नाही व गावांमध्ये बरेच ग्रामपंचायत ची जागा सुद्धा उपलब्ध आहे, गावामध्ये आज पर्यंत कोणत्याही समाजामध्ये धार्मिक वाद विवाद झाले नाही. व भविष्य मध्ये सुद्धा झाले पाहिजे नाही परंतु राजकीय समाज कंटकामुळे आपली राजकीय पोळी शिजण्याकरिता दोन समाजामध्ये तेळ निर्माण व्हावा व झाले पाहिजे हे त्यांचे उद्देश आहे. त्याकरिता योग्य रित्या लवकरात लवकर चौकशी करून त्या जागेवर दोन्ही समाजाचे समाधान व्हावे हे आमच्या कमेटी कडून निवेदन देण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित गुरुद्वारा कमेटी अध्यक्ष गुरमुख सिंग जुनी, सेवक सिंग बावरी, विजेंद्र सिंग जुनी, संगत सिंग जुनी, सेवक सिंग जुनी, रामसिंग बावरी, प्रेम सिंग जुनी, तकदीर सिंग जुनी, राणा सिंग बावरी, जयदेव सिंग बावरी, राज सिंग जुनी, अर्जुन सिंग जुनी, जसपाल सिंग जुनी, गोलू सिंग टाक, जंग सिंग टाक, नानक सिंग जुनी, व सिख समुदाय कमेटी निवेदन देताना उपस्थित होते
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…