श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हा तून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील अंबाजोगाईत येथे दिवसाढवळ्या भररस्त्यावर तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. मोंढा येथील रोडवर हा हत्येचा थराराने अनेक लोकांच्या शरीरात थरकाप उडाला.
शिक्षणाचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या अंबाजोगाई शहरात आज भरदिवसा वरदळीच्या ठिकाणी एका 37 वर्षीय तरुणावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडल्याने अंबाजोगाईत एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना ही छत्रपती शिवाजी महाराज चौका लगत असलेल्या मोंढा रोडवर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मयत झालेल्या तरुणाचे नाव राजेंद्र श्रीराम कळसे असे सांगण्यात येत असून ही हत्या जमीनीच्या वादातून झाल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे. हल्लेखोर हे राजेंद्र कळसे यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते.
प्राप्त माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील महसूल कॉलनी भागात राहणारे 37 वर्षीय राजेंद्र श्रीराम कळसे हे आज सकाळी अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या मोंढा रोडवर आले होते. त्याठिकाणी त्यांच्या मामाचे घर आणि दुकान असल्याचे सांगण्यात येते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक तीन ते चार जणांनी राजेंद्र कळसे यांच्यावर लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. दगडानेही मारहाण करण्यात आली. तब्बल अर्धा ते एक तासाच्या या हल्ल्यात राजेंद्र कळसे जागीच ठार झाले. भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी अंबाजोगाई शहरात तरुणाची हत्या घडून आल्याने भल्या थंडीत शहरातलं वातावरण गरम झालं. घटनेची माहिती अंबाजोगाई पोलिसांना कळताच घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राजेंद्र कळसेंचा मृतदेह तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आला. हल्लेखोर हे कळसे यांचे नातेवाईक असल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येते. सदरची हत्या ही जमीनीच्या वादातून झाल्याचेही सांगण्यात येत असून हल्लेखोरांमध्ये नेमके कोण आणि किती जण होते. हे मात्र समजू शकले नाही. घटना घडल्यानंतर अंबाजोगाई पोलीस सतर्क झाली असून आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले जाते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…