हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सर्वसमावेशक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (MPTRC) समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत अंगणवाडी ते 12 वी पर्यत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग मुला-मुलीचे अलिम्को संस्था जबलपूर मध्य प्रदेश मार्फत मोजमाप शिबिराचे आयोजन करून ३८१ विद्यार्थ्यांची साहित्य साधन करिता निश्चिती करण्यात आले. ज्यामध्ये व्हिलचेअर १३४, ट्रायसिकल 12 , सीपी चेअर ३०, रोलेटर ५६, श्रवणयंत्र ८४ असे साहित्य अलिम्को संस्था जबलपूर कडून प्राप्त झाले.
जागतिक दिव्यांग सप्ताह ३ ते ९ डिसेंबर चे औचित्य साधून दिनांक 5 डिसेंबर रोजी राजकुमार हिवारे शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे हस्ते समग्र शिक्षा येथे चंद्रपूर तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांना व्हिलचेअर, सीपी चेअर, रोलेटर साहित्य वितरित करण्यात आले. व उर्वरित सर्व साहित्य १५ तालुक्यात वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजन गणेश राखडे, फकिरा राठोड, अभय वनवे जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा जिल्हा परिषद यांनी केले. या वेळी कु. सुनिता कुशवाह, रत्नाकर निब्रड (समावेशित तज्ञ), कु. प्रतिभा आष्टणकर, श्री हावरे, पिपळशेट्टीवार, बनसोड, नागदेवते (विशेष शिक्षक) उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…