उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरज:- बाल गंधर्व नाट्यगृह मिरज येथे सुरू असलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उद्योगपती मा.सी.आर. सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट अॕँड मिडीया प्रा.लि.या संस्थेने सादर केलेल्या “शुद्ध बीजापोटी” या नाटकाला नाट्य रसीकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या प्रयोगाचे उद्घाटन निर्माते उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांच्या हस्ते बुद्ध वंदना करून झाले. नाटकाचे लेखन प्रेमानंद गज्वी यांनी केले आहे तर दिग्दर्शन नंदकुमार कुरुंदवाडकर यांनी केले आहे.
या नाटकाचा विषय वेगळा असून यात उच्च वर्णिय मुलगी आणि बौद्ध मुलगा यांच्या विवाहास उच्च वर्णिय वडिलांचा विरोध दर्शविला आहे.
सामाजिक,प्रबोधनाचा संदेश देणारे हे नाटक आहे.हि स्पर्धा राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येते. त्यामुळे ‘शुध्द बीजापोटी ‘या नाटकाने जाती विषमतेच्या बेड्या तोडून माणसाने माणसाला माणूस म्हणून स्वीकारावे यातच मानवाचे कल्याण आहे.हा विचार नाटकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा सार्थ प्रयत्न केला आहे.यातील सर्वंच कलाकारांनी अतिशय सुंदर कामे केली आहेत. नाटक चांगलं होण्यासाठी त्यांनी चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. यातील मुलीच्या वडिलांची भूमिका करणारे नंदकुमार कुरुंदवाडकर, मुलिची भूमिका करणारी रोहीणी लोंढे, संबुध्द आणि सुकळ्याची भूमिका करणारे दिपक गोठणेकर यांनी त्यांच्या अनुभवानुसार उत्कृष्ट अभिनय करत आपापल्या भूमिकांना चांगलाच न्याय दिला आहे. जाईची भूमिका करणार्या शैलजा साबळे या नवख्या असूनही कसलेल्या अभिनेत्री सारखा दमदार अभिनय करून नाट्य रसिकांची वाहवा मिळवली.
तसेच फौंडेशनचे कर्मचारी अविनाश जाधव हेही नवखे असूनही त्यांनी साकारलेला भटजीच्या पात्राने टाळ्या घेत भाव खाऊन गेला. बौद्ध मुलाची भूमिका साकारनारे आकाश शिंदेसह हर्षवर्धन यांनी ही उत्तम अभिनय करत रसिकांची मने जिंकली. वनिता कोरे व विश्वास मागाडे यांनीही चांगला अभिनय केला.सर्व कलाकारांनी नाट्य रसीकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले होते.
या नाटकाचे नेपथ्य- कासिम मुलाणी, प्रकाश- सुरज कांबळे, संगीत- योगेश साबळे, रंगभूषा- प्रियांका कांबळे, वेशभूषा- चेतना नागवंशी, दिपाली कांबळे, निर्मिती व्यवस्थापण- विश्वास मागाडे, सूत्रधार- दिपक गोठणेकर हे होते.रंगमंच व्यवस्था- सिध्दांत बोकणे, सिध्दार्थ पवार, दिक्षा पवार शिवम् कुरूंदवाडकर यांनी केली.
विशेष सहकार्य सुधीर कोलप, अॕड.संजिव साबळे, सचिन इनामदार, प्रदिप कांबळे, रविंद्र खांडेकर, विजय लांडगे, पवन वाघमारे, रुपाली बनसोडे, मनिषा जमने, दत्ता मागाडे, उत्कर्ष कांबळे, गणेश मोरे इ. यांचे मिळाले. या नाटकाला सांगली, मिरजेसह तालुक्यातील सातशेच्यावर नाट्य रसीक प्रामुख्याने उपस्थित होते. रसिकांनी सर्व कलाकाराच्या अभिनयाला दाद देत कौतुक केले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…