भरदिवसा गोळीबाराचा थरार; एकचा मृत्यू, भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा गावात अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून दोन गटात जोरदार वाद झाला. या वादाचे प्रर्यावसन नंतर गोळीबारात झाल्या यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झालेत. या भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरुन गेला आहे. या गोळीबारातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा गावात गुरूवार 7 डिसेंबर ला पारधी समाजातील दोन गटात तुफान राडा झाला. अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हा वाद झाला. या वादात तिघांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले, ज्यामधील एकाचा मृत्यू झाला. घटनेत एक महिलाही जखमी झाली असून त्यांच्यावर सध्या खामगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेतली. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

13 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

14 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago