केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी आमदार तिमांडे यांना दिलेला शब्द पाळला.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहराच्या माध्यमातून नॅशनल हायवे क्रमांक 7 नागपुर हैदराबाद महामार्ग जात असुन संविधान चौक कलोडे मंगल कार्यालय रोड ते उपजिल्हा रूग्णालयापर्यंत केंद्र सरकारच्या सीआरएफ फंडातुन उडान पुलाचे बांधकाम करण्याबाबत जनतेच्या आग्रास्थव माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या निवासस्थानी दिनांक १८ जून २०२१ ला तसेच ०४ एप्रिल २०२२ ला नितीन गडकरी यांच्या निवास्थानी भेट घेऊन चर्चा केली होती व संपूर्ण माहिती दिली होती.
त्यावेळी कलोडे चौक येथे उडान फुलाची निर्मिती करिता निधी देवू असे आश्वासन दिले होते.त्यावेळी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, तालुका अध्यक्ष विनोद वानखडे, माजी सरपंच राजु जवादे, मोरेश्वर शेंद्रे, सुशील वरुटकर, बालु बोरेकर, राजु देवतळे, गोकुल ढगे उपस्थित होते.
संविधान चौक कलोडे मंगल कार्यालय रोड ते उपजिल्हा रूग्णालयापर्यंत उडान पुलाचे बांधकाम करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
मागील अनेक अनेक दिवसापासून जनतेची ही मागणी प्रलंबित होती. विविध संघटनेने निवेदन सुद्धा दिले होते. आता कलोडे चौकातील उडान पुलाच्या निर्मिती करिता मंजुरी मिळाली असून बांधकाम निविदा काढण्यात आली असुन या पूला करिता अंदाजे १४५.३५ कोटी रुपयाच्या निधी मिळाला आहे व लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
नागपुर हैदराबाद महामार्ग क्रमांक 7 हिंगणघाट शहराच्या मध्य भागातून जातो. या मार्गावर खुप मोठया प्रमाणात ट्रक, ट्रॅव्हल्स, प्रायवेट गाडया, मोठ मोठ्या कंटेनर ईत्यादि वाहने २४ तास रहदारी सुरू असते. संविधान चौक ते उपजिल्हा रूग्णालय या भागात लोकांना चौकातुन येणे जाणे करावे लागतात. भरधाव वाहनामुळे या भागात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन लोक मृत्युमुखी पडले आहे. हा परिसर एक्सीडेंट झोन म्हणुन संबोधल्या जात होता.
शहरातील जनतेचे हित लक्षात घेत हिंगणघाट शहराच्या मध्य भागातून जाणा-या नॅशनल हायवे क्रमांक 7 वर संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालया पर्यंत केंद्र सरकारच्या सीआरएफ फंडातुन उडडाणपुलाच्या बांधकामा लवकरच सुरुवात होणार आहे.वत्याबद्दल माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…